Dharashiv Lok Sabha : धाराशिवचा तिढा सुटला, तानाजी सावंत एक पाऊल मागे? भाजपच्या आमदाराच्या पत्नीची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv Lok Sabha : भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतील आणि आजच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी माहिती समोर आली आहे.
Dharashiv Lok Sabha Constituency : धाराशिव : धाराशिव लोकसभेतील (Dharashiv Lok Sabha Election 2024) महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटल्याचं पाहायला मिळतंय. भाजप (BJP) आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटात (Ajit Pawar Group) प्रवेश करतील आणि आजच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अखेर धाराशिवबाबतचा महायुतीचा तिढा सुटल्यात जमा असल्याचं बोललं जात आहे.
याचा एक अर्थ असाही होतो की, तानाजी सावंत यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. कारण, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तानाजी सावंतांकडून त्यांच्यासाठी तिकीट मिळवण्यासाठीचे प्रयत्नही सुरू होते. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय सावंतांना लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसून अर्चना पाटलांना तिकीट दिलं जाणार आहे.
धाराशिवमध्ये मविआकडून ओमराजे निंबाळकर, महायुतीकडून कोण?
महाविकास आघाडीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून, मागील काही दिवसांत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा देखील केलेला. आता निंबाळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार? याची उत्सुकता होती. मात्र, अखेर महायुतीचाही तिढा सुटला असून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात येणार असल्याचं
मविआ आणि महायुतीची डोकेदुखी वाढली, पहिल्या टप्प्याला सुरुवात तरीसुद्धा उमेदवार ठरेनात
निवडणुका तोंडावर आल्या तरीदेखील अद्याप उमेदवार मिळत नसल्यानं महाविकास आघाडी आणि महायुचीची डोकेदुखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रातील 48 मधील असे काही मतदारसंघ आहेत, जिथे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पक्षाला जरी जागा सुटल्या असल्या तरी त्या-त्या पक्षांना काही मतदार संघात उमेदवार मिळत नाहीत. पक्षाकडून चाचपणी सुरू आहे, पण जंगजंग पछाडल्यानंतरही साजेशा उमेदवाराचा शोध काही संपत नाहीय. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास उशीर लागत आहे. तर काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी एकाच लोकसभा मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. त्या ठिकाणीसुद्धा पेच निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी अजूनही एखादा लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षानं लढवावा यावर एकमत होत नाही आहे.