(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar : गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनीही पुण्यातील घटनांवरून फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला.
बारामती : गुंडांना भीती वाटेनाशी झाली आहे. गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यातील घटनांवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार रोहित पवार सहभागी झाले. बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे त्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पालखीच्या रथाचे सारथ्य केलं. तसेच फुगडी खेळण्याचा तसेच टाळ देखील वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळी रोहित पवार यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलिसांवर हल्ले होऊ लागली आहेत. जमिनीवरून लोकांसाठी काम करायचं असतं. सरकार ते काम करत नाही, अशी टीका त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीस दोन समाजात द्वेष निर्माण करतात
रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लिन चिट देण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली. वायकर भाजप सोबत आल्याने त्यांना लॉलीपॉप किंवा गिफ्ट दिलं आहे. सत्तेत असलेली लोक गुंडाचा वापर करतात होते त्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. देवेंद्र फडणवीस दोन समाजात द्वेष निर्माण करतात. आम्ही या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. अजून पुढील काळामध्ये बाहेर काढत राहू, असा इशारा त्यांनी दिला. सर्वसामान्य लोकांचे सरकार महाराष्ट्रामध्ये आणणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
राज्यामध्ये परिस्थिती गंभीर
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राज्याच्या मध्ये बसलेल्या परिस्थितीवरून प्रयत्न जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे. क्राईम वाढत असल्याचे डेटामधून स्पष्ट होत आहे. आधी नागपूर क्राइम कॅपिटल होती आता पुणे होत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
वायकर यांना दिलेल्या क्लीन चिटवरून सुद्धा सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. हे लोक भ्रष्टाचारी नाहीत, तर आधी आरोप करायचे मग पक्षात घ्यायचं. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करायला सुरुवात केली. आरोप केले खरे काय खोटे काय याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, भ्रष्टाचाराची चेष्टा भाजपने केली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या