Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
Chief Minister Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमच्या मनातील विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे. 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' (Chief Minister Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सुक आहे. सरकारने या योजनेतील त्रुटी दूर करुन नव्याने बदल केले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेसंदर्भातील तुमच्या मनातील विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येईल.
आधार कार्ड रहिवासी दाखला/ जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला / रेशन कार्ड (केसरी/पिवळा) हमीपत्र बँक पासबुक जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर पतीची कागदपत्रे
अर्ज ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईनसाठी अंगणवाडी केंद्रावर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेचं भरायचा आहे. जिथे अशक्य आहे, तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करता येईल.
हो. गुगल प्ले स्टोअरवर नारीशक्ती दूत ॲप (Narishakti Doot App) आहे. नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करुन तुम्ही त्यावरून मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज भरु शकता.
ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. यासाठी कोणताही खर्च येणार नाही.
मुंबई, पुणे यासारख्या शहरात अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्रात ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करता येईल. संपूर्ण राज्यात कुठूनही ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.
परराज्यात महिलेचा जन्म झाला असेल आणि महिलेचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषाशी झाला असेल तर पतीचे 15 वर्षांपूर्वीच्या अधिवासाचे पुरावे सिद्ध करणारे कागदपत्रे अर्ज दाखल करताना द्यायची आहेत. असे केल्यास संबंधित महिलेला योजनेचा लाभ घेता येईल.
माहेर आणि सासर दोन्ही कडील नाव लिहिता येईल अशी व्यवस्था आहे. कागदपत्रावर असलेले नाव असावे.
पांढरा रेशन कार्ड असल्यास उत्पन्न पुरावा न्हणून उत्पन्न दाखला काढावा लागेल. वार्षिक 2.5 लाख पर्यंतचे उत्पन्न असल्यास योजनेसाठी अर्ज करावा.
या योजनेसाठी नवीन बँक खात्याची गरज नाही. आधीपासून असलेल्या बँक खात्याला केवळ आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी होईल. जुलैपासून योजना लागू असल्याने तेव्हापासूनचे पैसे अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थीला मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
