IAS Officer Pooja Khedkar's Family : खेडकर कुटुंबियांची मग्रुरी, जमीन हडपण्यासाठी शेतकऱ्यांचा चारा पेटवून दिला, शेळ्यांवर कुत्री सोडली; पोलिसही दखल घेईनात
IAS Officer Pooja Khedkar's Family, Pune : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या नावे पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी (Mulashi) तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली.
IAS Officer Pooja Khedkar's Family, Pune : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या नावे पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी (Mulashi) तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली. मात्र जेवढी जमीन खरेदी करण्यात आली त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटुंबाने दावा करायला सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर (Pooja Khedkar) यांची आई मनोरमा खेडकर यांनी चक्क पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावलं. या शेतकऱ्यांनी जेव्हा पोलिसांकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी देखील याची दखल घेतली नाही. त्यामुळे पुण्यात (Pune) कायद्याचं राज्य आहे की मुळशी पॅटर्न सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
पासलकर आणि मरगळे कुटुंबिय वडिलोपिर्जीत भात शेती कसतात
हातात पिस्तूल घेऊन धमकवणाऱ्या मनोरमा खेडकर या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई आहेत. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आणि सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या दिलीप खेडकर यांच्या पत्नी आहेत. मुळशी तालुक्यातील धडवली गावात पासलकर आणि मरगळे कुटुंबिय वडिलोपिर्जीत भात शेती कसतात. काही महिन्यांपूर्वी पासलकर कुटुंबातील एकाला हाताशी धरून पुजा खेडकर यांच्या नावाने जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर खेडकर कुटुंबाची अरेरावी सुरु झाली.
जमीन हडपण्यासाठी शेतकऱ्यांचा चारा पेटवून दिला, शेळ्यांवर कुत्री सोडली
ही जमीन खेडकर कुटुंबीयांच्या सामाईक मालकीची असुन अजून या जमीनीच्या वाटण्या झालेल्या नाहीत, असा पासलकर कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र खेडकर कुटुंबाने मन मानेल त्या ठिकाणी जमीनीवर दावा करायला सुरुवात केली. त्याला विरोध करणाऱ्या मरगळे आणि पासलकर या शेतकरी कुटुंबांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पेटवून देण्यात आला तर कधी त्यांच्या शेळ्यांवर कुत्री सोडण्यात आली. मुळशी भागातील जमीनी हडप करण्यासाठी लॅन्ड माफियांनी मांडलेला उच्छाद मुळशी पॅटर्न सीनेमात प्रेक्षकांनी पाहिलाय. मात्र इथं ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते खेडकर कुटुंबच हा पॅटर्न राबविताना दिसतंय.
पोलिसांकडून शेतकरी कुटुंबांवरच गुन्हे दाखल करण्यात आले
प्रेमात पडावं असा इथला निसर्ग आहे . पानशेत आणि वरसगाव धरणाचं पाणलोट क्षेत्र आणि त्याला लागून असलेली ही भातशेती आहे, पण काही वर्षांपूर्वी इथल्या या निसर्गाला लॅन्ड माफियांच ग्रहण लागलं. लॅन्ड माफियांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ मिळाली. खेडकर कुटुंबाने देखील इथे शेतजमीन खरेदी केली आणि इथे वडिलोपार्जीत शेती करणाऱ्या पासलकर कुटुंबियांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या कुटुंबाने याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उलट पौड पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले.
खेडकर कुटुंबाने मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी जमीन खरेदी केल्याच स्थानिकांच म्हणणंय. मात्र राजकीय वरदहस्त लाभल्याने खरेदी केलेल्या जमीनी बरोबरच स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीनीवर ताबा मिळवण्याचा त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होतोय. त्यासाठी अगदी पिस्तूलाने धमकावण्या पर्यंत त्यांची मजल गेलीय.
इथे कायद्याचं राज्य आहे की खरंच मुळशी पॅटर्न सुरू ?
कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच पिस्तूलाचा धाक दाखवतायत. एरवी हे असं दृश्य सिनेमात पहायला मिळतं. पण इथं हे प्रत्यक्षात घडतय आणि ते देखील अशांकडून ज्यांना सनदी अधिकारी म्हणून काम करण्याचा तीन पिढ्यांचा वारसा आहे. दाद मागून देखील या लोकांना दादा मिळत नसेल तर प्रश्न उपस्थित होतोय की इथे कायद्याचं राज्य आहे की खरंच मुळशी पॅटर्न सुरू झालाय.
इतर महत्वाच्या बातम्या