एक्स्प्लोर

Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 November 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 22 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व कामं वेळेवर पूर्ण कराल. कोणताही वाद बराच काळ अडकला असेल तर तोही सोडवला जाऊ शकतो. तुम्हाला काही नवीन मालमत्ता मिळेल. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो.

वृषभ (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप आनंदी व्हाल. विरोधकांच्या षडयंत्रातून वाचाल. आज कुटुंबात दिवस चांगला जाईल. बहिणभावांशी सलोखा राहील. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. आजचा दिवस नफ्याचा असेल. तुमचं आरोग्य ठणठणीत असेल.

मिथुन (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्न वाढीचा असेल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना कोणतीही जोखीम घेण्यापासून दूर राहावं लागेल. तुमचं उत्पन्न वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. नवीन काम सुरू करणारे लोक एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. तुमचं एखादं काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका.

कर्क (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायात वाढ झाल्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. कौटुंबिक जीवनात आनंदाची भरभराट होईल. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे.

सिंह (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने तुमचं नुकसान होईल. नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कामात पूर्ण लक्ष द्यावं. सासरच्या मंडळींसोबतच्या नात्यात कटुता असेल तर तीही दूर होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल.

कन्या (Virgo Today Horoscope) 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही छोट्या नफ्याच्या योजनांकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमच्या मुलाला नवीन नोकरी मिळू शकते. कलात्मक क्षेत्रात प्रगती होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. कौटुंबिक बाबी घरीच सोडवणे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेत चांगली गुंतवणूक करू शकता.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही प्रवासाला जाण्याचं नियोजन आखू शकता. तसेच, जर अनेक दिवसांपासून तुमचं घर किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याचं स्वप्न असेल तर ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात तुमचं चांगलं मन रमेल. अनेक मोठमोठ्या बिझनेस डील तुमच्यासमोर येतील. त्यामुळे तुम्ही यशाच्या उंच शिखरावर असाल. तसेच, कामाच्या बाबतीत सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचं अनेक दिवसांपासून जे काम रखडलं आहे ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, आज तुमच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. घरात नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तसेच, तुमच्या मुलांची प्रगती बघून तुम्हाला समाधानी वाटेल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. पण, आज दिवसभर तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुम्हाला जेवायलाही वेळ मिळणार नाही. शनी मार्गी असल्या कारणाने तुमच्यावर कामाचा ताण असणार आहे. अशा वेळी संयम ठेवा आणि शांततेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक बदल पाहायला मिळतील. अनेक नवीन गोष्टी तुमच्याबरोबर घडतील. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मात्र, आज दिवसभरात तुमचा खूप खर्च होईल. दिवाळीचा सण असल्या कारणाने घरी पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. तसेच, नवीन काम सुरु करण्यासाठी तुम्हाला काही काळ जाऊ द्यावा लागेल. कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. तसेच, कुटुंबियांबरोबर लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला भेट द्याल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. तसेच, जर तुम्ही नवीन घर, वाहन, प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्याचबरोबर तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. मात्र, तुमच्यासमोर अनेक आव्हानंदेखील असतील. त्याचा तुम्हाला सामना करता यायला हवा. तसेच, तुमच्या आरोग्याबाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवता येईल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shukra Gochar 2024 : 22 डिसेंबरपासून 'या' राशींना सोन्याचे दिवस; शुक्राचं राशी परिवर्तन ठरणार लकी, सुख-संपत्ती होणार अपार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : गिते गँगकडून घुले, वाल्मिक कराडची धुलाई, बीड जेलमधील मारहाणीची इनसाईड स्टोरीGold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धसSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
'हे' पदार्थ चुकूनही टिफिनमध्ये पॅक करू नका!
'हे' पदार्थ चुकूनही टिफिनमध्ये पॅक करू नका!
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
Embed widget