एक्स्प्लोर

Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टी सुरू असलेलं हॉटेल बुकींगही खडसेंच्या जावयाच्या नावावर; 25 ते 28 जुलै पर्यंत होत बुकिंग, पावतीही सापडली

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हे बुकिंग केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत.

पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आहे. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  दरम्यान याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. तर ही पार्टी आयोजित केलेल्या हॉटेल बुकिंग हे प्रांजल यांच्या नावे असल्याचे समोर आले आहेत.

प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हे बुकिंग केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत.  25 ते 28 जुलै पर्यंत हे बुकिंग करण्यात आलेलं होतं. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. 10 हजार 357रुपये असे याचे भाडे होते. एका रूमचे बुकिंग 25 ते 28 तर दुसऱ्या रूमचे बुकिंग 26 ते 27 जुलै दरम्यान करण्यात आलं होतं. या माहितीनंतर आता ही पार्टी प्रंजल खेवलकर यांनीच आयोजित केली होती का अशी चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत प्रांजल खेवलकर?

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

छापेमारीचा पहिला व्हिडीओ आला समोर

खराडीतील ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, त्या ठिकाणी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या छापेमारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहेत. ज्यावेळी पोलिसांनी संबंधित फ्लॅटमध्ये छापा टाकला. तेव्हा या पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासह इतर चार पुरुष आणि तीन महिला आढळून आल्या. सर्वजण हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी करत असल्याचं समोर आलं. अमली पदार्थ, हुक्का आणि दारुसाठा सापडला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सविस्तर तपास सुरू आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget