एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने 'या' एक्स्प्रेस रद्द
मालगाडी घसरल्याने पुण्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रगती एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा घाटात मालगाडी रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतूक कोलमडली. पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे मार्गावरील जामरुंग आणि ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे 4.30 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद झाली आहे. तर अप लाईन म्हणजे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु आहे. मालगाडीचे डबे घसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील रद्द एक्स्प्रेस
- सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
- सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
- सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
- सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (मुंबई-पुणेदरम्यान रद्द)
- भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (नाशिक रोड स्टेशन स्थानकात थांबवली)
- पुणे-भुसावळ एक्स्प्रेस
- पुणे-पनवेल पॅसेंजर
- पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
- पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
- सीएसएमटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेस
- कल्याण-इगतपुरी-मनमाड एक्स्प्रेस
- अहमदाबाद-पुणे दुरांत एक्स्प्रेस
- इंदूर-पुणे एक्स्प्रेस
- हुजूर साहिब - (पनवेल न जाता पुण्यात थांबवली)
- भुसावळ - पुणे (नाशिक मध्ये थांबली)
- हमसफर एक्सप्रेस - (पनवेलमध्ये थांबली)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement