एक्स्प्लोर

मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 111 ते 12 या वेळेत करण्यात आले होते.

मुंबई: राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायती निवडणुकीच्या (Election) मतमोजणीमुळे 21 डिसेंबर रोजीची एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 (Exam) अनुक्रमे 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, अशी माहिती आयोगाने दिली. त्यामुळे, परीक्षार्थी, उमेदवारांनी याची दखल घ्यायला हवी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 111 ते 12 या वेळेत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 2024 कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर 2025 रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपरोक्तप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडून मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने, काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे.

4 आणि 11 जानेवारीला होणार परीक्षा

आयोगाच्या परपत्रकानुसार, एमपीएससी गट '' संयुक्त सेवा पूर्व परीक्षेची नवी तारीख 4 जानेवारी 2026 रोजी ठेवण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र गट '' ची संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा

तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
Vasant More: वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
Vasant More: वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
Ind vs Nz 1st T20 Turning Point : सामना फिरवला अन् रक्तबंबाळ झाला, न्यूझीलंडचा पराभव तिथेच ठरला; पहिल्या टी-20 मधील टर्निंग पॉइंट कोणता?
सामना फिरवला अन् रक्तबंबाळ झाला, न्यूझीलंडचा पराभव तिथेच ठरला; पहिल्या टी-20 मधील टर्निंग पॉइंट कोणता?
Nagpur Crime News: एकतर्फी प्रेमाचा भयंकर अंत, विवाहित शेजाऱ्याने 23 वर्षीय तरुणीला संपवलं, नंतर मृतदेह फॅनला लटकावला अन्...; घटनेनं नागपूर हादरलं!
एकतर्फी प्रेमाचा भयंकर अंत, विवाहित शेजाऱ्याने 23 वर्षीय तरुणीला संपवलं, नंतर मृतदेह फॅनला लटकावला अन्...; घटनेनं नागपूर हादरलं!
Pune News: माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही; इंदापूरचा अधिकारी बोल बोल बोलला, आता कारवाई, नेमकं प्रकरण काय?
माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही; इंदापूरचा अधिकारी बोल बोल बोलला, आता कारवाई, नेमकं प्रकरण काय?
'निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी' म्हणणाऱ्या मनसे नेत्याला दिग्पाल लांजेकरांचं प्रत्युत्तर, स्पष्टच म्हणाले..
'निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी' म्हणणाऱ्या मनसे नेत्याला दिग्पाल लांजेकरांचं प्रत्युत्तर, स्पष्टच म्हणाले..
Embed widget