एक्स्प्लोर

शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार

आज आमच्या विधानसभेतही आम्ही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला आमच्याकडून नमन केलं आहे, आणि पुढच्या अधिवेशनात आमच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, वंदे मातरमवर आमच्या विधानसभेतही चर्चा होईल.

नागपूर : वंदे मातरम (Vande matram) हे केवळ गीत नाही तर हे भारताच्या स्वातंत्र्याचा मंत्र आहे, हा राष्ट्रवादाचा मंत्र आहे. ज्या वंदे मातरमला गाताना भारताच्या कित्येक स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारी फाशीवर गेले परंतु उप तक नाही म्हटलं, हा तो महामंत्र आहे. या महामंत्राने सामान्य व्यक्तीला स्वतंत्रतेच्या आंदोलनाशी जोडलं, आता त्याचे दीडशे वर्ष पूर्ण झाल्यावर संसदेत चर्चा होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत वंदे मातरमच्या संसदेतील चर्चेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. तसेच, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वंदे मातरम घोषणेला बंदी केल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर उत्तरही दिलंय. वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज आमच्या विधानसभेतही आम्ही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला आमच्याकडून नमन केलं आहे, आणि पुढच्या अधिवेशनात आमच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, वंदे मातरमवर आमच्या विधानसभेतही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. तसेच, वंदे मातरमच्या घोषणेवर बंदी घालण्यात आली आहे, आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का, देशाचा जयजयकार चालणार नाही का? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावरुन, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही, वंदे मातरमवर जे काही आघात झाले त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरमला कापलं आणि अर्धेच वंदे मातरम गायलं जाईल असं केलं. आज त्याच काँग्रेससोबत गळ्याला गळा मिळवून आदित्य ठाकरे रोज फिरतात, त्यांनी भाजपला नाही तर काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा नेहमीच सन्मान झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही मजबुतीने शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिशी

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार भाजपात जाणार असल्याच्या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरूनही फडणवीसांनी पलटवार केला. म्हणण्याकरिता उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे 20 आमदार आहेत, तेही भाजपच्या गळ्याला लागलेत, असं कोणाच्या म्हणण्याने होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचंय? असे उत्तर फडणवीस यांनी दिले. शिवसेना शिंदेसेना आमचा मित्र पक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे, त्यामुळे मित्र पक्षाचे आमदार आम्हाला घेऊन अशा प्रकारचं राजकारण करत नाही. याउलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना भाजप आणि आमची महायुती अजून मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही  वाचा

मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget