एक्स्प्लोर
प्रसिद्ध डॉ. जयश्री तोडकरांकडे 20 लाखांच्या खंडणीची मागणी
लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नामांकित डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नामांकित डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई येथील पाच डॉक्टरांविरोधात पुण्यातल्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रदीप चौबे, राजेश खुल्लर, अतुल पीटर, मुजफ्फर लकडावाला आणि श्रीहरी ढोरे पाटील या पाच डॉक्टरांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोपही तोडकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ओबेसिटीच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादातून इमेलद्वारे जयश्री तोडकर यांना ही 20 लाखांची खंडणी मागण्यात आली. या इमेलमध्ये या डॉक्टरांनी अर्वाच्च भाषाही वापरल्याचं कळतं आहे.
निवडणुकीत सहभागी असलेल्या संस्थेच्या सभासदांनाही असे इमेल पाठवण्यात आले आहेत. बदनामी थांबवायची असल्यास 20 लाख मोजावे लागतील, अशी धमकीही यात देण्यात आली आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement