कोरोनाच्या संकटात डॉक्टरची वन्यजीवांना अशीही मदत..
कोरोना विषाणूचा फटका अप्रत्यक्षरित्या वन्यप्राण्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्ह्याळ्यामुळे अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या पाण्याची गैरसोय होत आहे. अशातचं सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील डॉ. एम. के. इनामदार यांनी स्वखर्चाने एक लाख लिटर पाणी सोडून तीव्र उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान भागवण्याचे कार्य हाती घेतलं आहे.

बारामती : कोरोना निर्मुलनाच्या कामात जीवाची बाजी लावून लढणारे घटक म्हणून वैद्यकीय क्षेत्र व पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने जनमानसात आदराचे स्थान मिळवले आहे. पण वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मनुष्यच नव्हे प्रत्येक सजीवाच्या जीवाची काळजी वाटते. त्यासाठी ते आपल्या व्यस्त कामातून वेळ काढतात. लौकीक अर्थाने अलौकिक काम करुन जातात. ही किमया डॉ. इनामदार यांनी करुन दाखवली आहे. सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात डॉ. इनामदार यांना त्यांच्या निर्णायक उपचार पद्धतीसाठी ओळखले जाते.
इंदापूर तालुक्यात 6 हजार 105 हेक्टर वनपरिक्षेत्र आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. मुख्यत्वे चिंकारा जातीच्या हरणांचे अभयवन म्हणून या वनपरिक्षेत्राची राज्यात ओळख आहे. या सर्व प्राण्यांची तहान भागवण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब करत आहे. लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी उपलब्ध नसल्याने टँकर मिळणे जिकिरीचे झाले होते. पाणी पुरवठा करण्यासाठी यातायात करावी लागत होती. त्यामुळे 'क्लब'ने पुरवठ्याबाबत लोकांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत डॉ. इनामदार यांनी पाणी पुरवठा करुन वन्यजीवांना दिलासा दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर संकटात व लॉकडाउन काळात डॉक्टरची वन्यजीवांना केलेल्या या मदतीमुळे नक्कीच प्राण्यांची तहान भागणार आहे.
लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय?, राज ठाकरेंची विचारणा; सरकारला नऊ सूचना
भटक्या जनावरांचे कोरोनामुळे हाल कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परिणामी सर्वांना घरातचं बसावे लागत आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. या लोकांपर्यंत कुठूनतरी मदत पोहचत आहे. मात्र, भटक्या मुक्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात श्वान, गाई आणि इतर शहरात फिरणाऱ्या जनावरांचा समावेश आहे. मुंबईत तर अनेक घरगुती श्वान बेवारस फिरताना दिसत आहे. या जनावरांसाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, तो तोकडा पडत असल्याचे दिसत आहे.
Raj Thackeray | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? : राज ठाकरे























