(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis on PM Modi : आपले मोदीजी फक्त भारताचे नव्हे, तर शंभर देशाचे नेते आहेत : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on PM Modi : आम्ही कोविडच्या काळात मोदीजींमुळे जिवंत आहोत. जगातले अर्थशास्त्रज्ज्ञ मोदींनी भारतात ही क्रांती कशी घडवली? अशी विचारणा करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis on PM Modi : जगातील शंभर देश म्हणतात, आम्ही कोविडच्या काळात मोदीजी मुळं जिवंत आहोत, म्हणजे आपले मोदीजी फक्त भारताचे नव्हे तर शंभर देशाचे नेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पुण्यात प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.
मोदीजी जगातील शंभर देशाचे नेते आहेत
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कोविडच्या काळात मोदीजींमुळे जिवंत आहोत. जगातले अर्थशास्त्रज्ज्ञ मोदींनी भारतात ही क्रांती कशी घडवली? अशी विचारणा करत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, बैलगाडा धावतो तसा विकासाचा वेग आपल्याला गाठायचा आहे. मोदीजी जगातील शंभर देशाचे नेते आहेत.
....म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मोदींनी ऑफर दिली
फडणवीस म्हणाले की, बारामतीची निवडणूक झाल्यावर शरद पवार साहेबांचे वक्तव्य ऐकलं अन लक्षात आलं असेल मोसम बदलला आहे. 4 जूननंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील. आपलं दुकान चालत असताना, आपण दुसऱ्या दुकानात आपलं दुकान शिफ्ट करतो का? याचा अर्थ आता अजित पवारांची हवा सुरू झाली आहे. दुसरीकडे शरद पवार हे उद्धव ठाकरेंचा पक्ष घेऊन डुबणार आहेत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भाजप सोबत येण्याचं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत येण्याची ऑफर दिली आहे.
मालिकांमधून निवृत्ती घेण्याची घोषणा हे नाटक
त्यांनी सांगितले की, अमोल कोल्हेंचा सिनेमा फ्लॉप झाला आहे. त्यामुळं त्यांचं तिकीट आता घेऊ नका. निवडणूक आली की मालिकांमधून निवृत्ती घेतो अशी घोषणा करायची अन नंतर फक्त नाटकं करतात. आता परत तशीच घोषणा केलेली आहे. मला खात्री आहे, शिरूरची जनता नाटकं करणाऱ्यांना योग्य जागा दाखवते हे मला ठाऊक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या