Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आंदोलनावर हल्लाबोल केला आहे. काय म्हणालेत वाचा सविस्तर.
पुणे: पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण आज रविवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन पध्दतीने हे उद्घाटन करण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. केंआज ऑनलाईन माध्यमातून हे उद्घाटन रविवारी 29 सप्टेंबरला होणार आहे.(Pune Metro inaugurate) या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), अजित पवार(Ajit Pawar), मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री छगन भुजबळ आदी नेते उपस्थित आहेत, या कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आंदोलनावर हल्लाबोल केला आहे. कार्यक्रम पुढे ढकलला गेला. यामुळे काही लोकं छात्या बडवत होते. यांनी कधी एक पिलर बांधला नाही. आधी कामं करा आणि नंतर छात्या बडवत रहा अशा शब्दात त्यांनी मविआच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
या कार्यक्रमावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा आजचा कार्यक्रम आहे, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जो वारसा दिला तो पुढे नेण्याचा कार्यक्रम आहे, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेतून आमच्या मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. आम्ही सगळे भिडे वाड्यासाठी लढाई मध्ये आलो, ती लढाई जिंकलो, भिडे वाड्यातील स्मारक आपल्याला प्रेरणा देईल. पुणे समाजसुधारक यांची भूमी आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. विकासाचा सुद्धा आज कार्यक्रम आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणालेत.
तर विरोधकांवर टीका करताना म्हणाले, गुरूवारी होणारा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. त्यामुळे काही लोकं छात्या बडवत होते. यांनी कधी एक पिलर बांधला नाही. आधी कामं करा आणि नंतर छात्या बडवत रहा.स्वारगेट मेट्रो स्टेशन पूर्ण झाल्यावर प्रवास करण्यासाठी ते पाहायला येतील. सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सगळ्या कोपऱ्यात मेट्रोने प्रवास करता येईल. लवकरच सोलापूरला विमासेवा सुद्धा सुरुवात होणार आहे. पण काही लोकांच्या पोटात दुखु लागलं पण काळजी करू नका लवकरच सेवा सुरू करण्यात येणार आहे. पाच वर्ष आपण जर कळ काढली तर राज्यातील सर्वात नियंत्रित वाहतूक कुठे असेल तर पुण्यात असेल असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावेळी व्यक्त केली आहे.