एक्स्प्लोर

Ajit Pawar : डॉक्टरांनो... सून म्हणून आल्या तरी बाहेरचं म्हणणार नाही; अजित पवारांनी शरद पवारांना 'त्या' वक्तव्यावरुन सुनावलं!

इंदापूरच्या वकीलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचं नाव घेऊन 'तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात', असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला.

इंदापूर, बारामती : घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, असं शरद पवार (Sharad pawar) म्हणाले त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. सून सुनेत्रा पवारांच्या (Sunetra pawar) डोळ्यातंही शरद पवारांचं वक्तव्य ऐकून पाणी आलं. त्यानंतर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) इंदापूरच्या वकीलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचं नाव घेऊन 'तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात', असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला. त्यासोबतच डॉक्टरांशी सगळे खरे बोलतात. त्यामुळे तुम्ही नक्की राजकारणात काय चाललं आहे आपल्या रुग्णांना विचारा. आमचं नाव घेतलं तर जरा चांगले बोला जर दुसरे नावं घेतलं तर जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी केली 

अजित पवार आज बारामती,दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. तिन्ही ठिकाणी अजित पवार डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेणार आहेत. दौऱ्याची सुरुवात इंदापूरपासून केली आहे. इंदापूरमध्ये अजित पवार वकील आणि डॉक्टरांचा मेळावा घेत आहेत. अजित पवार इंदापुरात पोहोचले त्यांच्यासोबत आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, प्रदीप गारटकर, प्रवीण माने उपस्थित आहेत.

अजित पवार म्हणाले की, आम्ही सगळेच निवडणुकीचे टप्पे व्यस्त राहणार आहोत. बाकी सगळ्यांसोबतच डॉक्टरांचे आणि वकिलांचेदेखील अनेक प्रश्न आहेत. एका डॉक्टर महिलेचं नाव घेऊन तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात, असंदेखील ते म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रात मत्तेदारी असता कामा नये. आम्ही लोकाभिमुख कामे करतो पण काही गोष्टीत आम्ही चुकू शकतो. काम करणारा चुकतो जो कामच करीत नाही तर तो चुकेल कसा?, असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला आहे. 

त्यासोबतच त्यांनी सुप्रिया सुळेंवरदेखील निशाणा साधला. मीच आताच्या खासदारासाठी मते मागितली पण कोणताही केंद्राचा प्रोजेक्ट इथे आला नाही, असा आरोप त्यांनी सुप्रिया सुळेंवर केला आहे. त्यासोबतच पंतप्रधना नरेंद्र मोदींना मी विरोध करत होतो. नरेंद्र मोदींना कोणीही पर्याय नाही. राहूल गांधींना पर्याय म्हणूण बघितलं तर काय होऊल हे वेगळं सांगायला नको, असंही म्हणत त्यांनी राहूल गांधींवर टीका केली. 

मी वाडपी आहे... 

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येत. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत तुम्ही खासदाराला निवडून दिले  आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिलं तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीच हा खासदार उजवा असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

इतर महत्वाची बातमी-

Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात, MIM चा उमेदवार जाहीर; धंगेकरांच्या अडचणी वाढणार, अंनिस सुंडके मैदाात उतरणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहितीPushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget