एक्स्प्लोर

Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात, MIM चा उमेदवार जाहीर; धंगेकरांच्या अडचणी वाढणार, अंनिस सुंडके मैदाात उतरणार

पुणे लोकसभा मतदारसंघातून  अनिस सुंडके (Anis Sundake) यांना AIMIM कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  

पुणे : पुणे लोकसभा  (Pune Loksabha Constituency)मतदारसंघात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून  अनिस सुंडके (Anis Sundake) यांना AIMIM कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुंडके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अनिस सुंडके राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि अजित पवारांचे विश्वासू आहेत. त्यामुळे आता पुण्यात चौरंगी लढत होणार आहे. 

अनिस सुंडके हे पुण्यातील कोंढवा भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.  त्यांचा हा भाग शिरुर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. काही दिवसांपासून सुंडके हे शिरुरचे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते.  मात्र सुंडके यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार आहोत. निवडणूक लढविली पाहिजे, अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की पुणे लोकसभा निवडणुकीत 'AIMIM उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील, असा विश्वास खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.

धंगेकरांचं टेन्शन वाढणार?
 
अंनिस यांच्या निवडणुकीत उतरल्याने पुणे लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांच्या मतांचं विभाजण होणार असल्याचं बोललं जात आहे.सुरुवातीला मुस्लिम धर्माची मतं हे रवींद्र धंगेकरांना मिळतील आणि त्यांच्या मतांचा आकडा वाढेल, असं बोललं गेलं. मात्र आता अंनिस यांच्या मैदानात उतरल्याने मुस्लिम मतांची विभागणी होऊन त्याचा फटका थेट रवींद्र धंगेकरांना बसणार आहे. 

25 वर्षांपासून पुणे लोकसभेत सक्रिय

मागील 25 वर्षांपासून पुण्यात काम करत आहोत. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत. पुण्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहे. हे प्रश्न आधीदेखील सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावण्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलेले आहे. पुणे महानगर पालिकेत पण काम केलं आहे आणि माझा लोकांशीदेखील संपर्क चांगला आहे, असं अंनिस यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

अजित दादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासूनच सुरू होतं भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग; रोहित पवारांचा हल्लाबो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | केंद्रीय वखार महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती | 16 Dec 2024 |  ABP MajhaChandrashekhar Bawankule : भुजबळांना महायुतीत चांगलं स्थान मिळेल, बावनकुळेंचं मोठं वक्तव्यZero Hour :  आक्रमक भुजबळ पुढं काय करणार? राहणार की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Embed widget