Pune Crime news : पोलीस रिक्षाने आरोपीला येरवड्यात घेऊन जात होते, आरोपी पाणी पिण्याच्या बाहण्याने थांबला अन् पळून गेला; तीन पोलिसांचं निलंबन
पुण्यातील तीन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. एका आरोपीला परस्पर खासगी रिक्षाने घेऊन जात असताना तो पळून गेल्याने तिघांचं थेट निलंबन करण्यात आलं आहे.
Pune Police : पुण्यातील तीन पोलिसांचं तडकाफडकी(Pune Police suspended) निलंबन करण्यात आलं आहे. एका आरोपीला परस्पर खासगी रिक्षाने (Private Rickshaw) घेऊन जात असताना तो पळून गेल्याने तिघांचं निलंबन करण्यात आलं आहे. तिघेही (Police) येरवडा(Yerwada jail) कारागृहातून 3 आरोपींना न्यायालयात (Pune Shivajinagar court ) हजर करुन त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात जमा करण्याच्या नेमणुकीवर होते.
पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे , राजूदास रामजी चव्हाण आणि इतर एका पोलिस कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (Rohidas pawar ) यांनी हा आदेश काढला आहे. तिघेही पोलीस कर्मचारी कोर्ट कंपनी म्हणून पोलीस मुख्यालयात नेमणूकीला आहेत. येरवडा कारागृहातून आरोपींना घेऊन त्यांना सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला हजर करुन कामकाज संपल्यावर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात जमा करण्याचे कर्तव्यावर तिघांची 2 ऑगस्ट रोजी नेमणूक करण्यात आली होती.
त्याप्रमाणे त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यातील एक आरोपी राजेश रावसाहेब कांबळे याला पुढील तारीख देण्यात आली होती. त्याच दरम्यान बाकी आरोपींच्या खटल्याचं काम सुरु होतं. त्यादरम्यान या तीन पोलिसांमध्ये एका पोलिसांनी राजेश कांबळे याला खासगी रिक्षाने घेऊन जाऊन येरवडा कारागृहात जमा करतो, असे सांगितले आणि घेऊन गेले. यासाठी इतर दोन पोलिसांनीदेखील परवानगी दिली होती. तहान लागल्याचे सांगितल्याने वाटेत रिक्षा थांबविली.कांबळे पाणी पिण्यासाठी रिक्षातून उतरला व साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला होता. त्यामुळे या तिघांवर थेट कारवाई करण्यात आली आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर....
पुण्यात वाढती गुन्हेगारी पाहता अनेक पुणेकरांनी पुणे पोलीस नक्की काय करत आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांवर देखील कारवाई होणार आहे. दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-