एक्स्प्लोर

Pune Metro : पक्के पुणेकर! शेवटी पुणेकरांनी मेट्रो हात दाखवून थांबवलीच; व्हिडीओ पाहून तुम्हीही ठेवाल डोक्यावर हात

पुणे मेट्रो थेट हात दाखवून थांबवल्यामुळे पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. या सगळ्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pune Metro काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. मात्र पहिल्या टप्प्यापासूनच वेगवेगळ्या कारणांवरुन मेट्रोची चांगलीच चर्चा झाली. मात्र आता पुणे मेट्रो थेट हात दाखवून थांबवल्यामुळे पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. या सगळ्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मेट्रो प्लॅटफॉर्मवर थांबून परत निघालेली असताना दोन व्यक्तींनी हात करून मेट्रो थांबवली आणि मेट्रो थांबलीही. दोघेही आरामात मेट्रोलत चढले आणि मेट्रोल पुन्हा मार्गस्थ झाले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आधीच अनेक कारणांवरुन ट्रोल झालेल्या मेट्रोचं पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सुरु झालं आहे. "नशिब हात दाखवून थांबवली नाहीतर एक राईड चालवून चेक केलं असतं व्यवस्थित चालते का मेट्रो?", "पुणेकर भविष्यात विमानसुद्धा थांबवतील", "पुणेकर काही करू शकतात... अगदी काहीही...!", "आम्ही पुणेकर बुलेट ट्रेन हात दाखवून थांबवू शकतो... ही तर साधी मेट्रो आहे", अशा कमेंट्स पुणेकरांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येते आणि ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दार वाजवताना दिसत आहे आणि त्याला दरवाजे उघडण्याची विनंती करताना दिसत आहे. त्यानंतर मेट्रोचे दारं उघडतं आणि व्यक्ती मेट्रोत बसते. तर दुसरा एक व्यक्तीसुद्धा उशीर झाला असताना पळत, घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करताना दिसत आहे आणि नंतर बसून प्रवास करतात. हा व्हिडीओ लोको पायलेटच्या केबीनच्या दरवाजाजवळ म्हणजेच मेट्रोचा चालक बसतो त्या पहिल्या डब्ब्याजवळ प्लॅटफॉर्मवरुन शूट करण्यात आला आहे. मेट्रोचे दरवाजे बंद होतात. सिव्हिल कोर्ट स्थानकावरुन पिंपरी-चिंचवडसाठी सुटणाऱ्या मेट्रोचा हा व्हिडीओ आहे.

पुण्यातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर गर्दीदेखील होताना दिसत आहे. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे हा टप्पा सुरु झाल्यापासून अति प्रमाणात गर्दी होत आहे. 

पुणे मेट्रोतील करामती व्हायरल...

पुणे मेट्रोतील करामती अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. मागच्यावेळी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशन, भजन करण्यात आलं होतं. याच सगळ्या करामती आणि पुणे मेट्रोचा होणार उपयोग पाहून पुणे मेट्रोनं नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे. त्यासोबतच ढोल ताशाचं वादनही करण्यात आलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Pune metro whatsapp Ticket : पुणे मेट्रो सुसाट, स्थानकावर तिकीटांसाठी रांगा, WhatsApp वरुन घरबसल्या करा मेट्रोचं तिकीट बुक, 'या' आहेत सोप्या स्टेप्स

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Embed widget