Chandrakant Patil ... 'तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईल अन् सीमेवर जाऊन सैनिकांची भांडी, कपडे धुईल'; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले...
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर काय? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
Chandrakant Patil in Pune: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर काय? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, मला जेव्हा केव्हा सांगतील तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईल आणि सीमेवर जाऊन सैनिकांची भांडी धुईल, कपडे धुईल, ही सेवा मी करेल मला बायकोचा ही पाठिंबा आहे. प्रत्येक जण मेरे सपनो का भारत पाहत असतो, माझ्या स्वप्नातील भारत अफाट आहे, असंही ते म्हणाले.
महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत, सगळीकडे त्यांचं वर्चस्व
चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, इसवी सन शून्य ते बाराशे वर्षांपर्यंत आपला देश गुण्यागोविंदाने चालला होता. मात्र नंतर दृष्ट लागली आणि आक्रमण येत गेली अन् या देशाचा सत्यानाश केला. त्यात अनेक जणांना डोकं होतं. त्यांनी ओळखलं की, या देशातील हिंदू पुरुष लढवय्या आहे, पण तो दोन गोष्टींनी खचून जातो. पहिली म्हणजे त्याचा देव भ्रष्ट झाला अन् दुसरी म्हणजे त्याची स्त्री भ्रष्ट झाली तर.. म्हणून त्या लोकांनी अभ्यास करून आपली मंदिरं तोडली आणि मुर्त्या पाण्यात टाकल्या, असंच त्यांनी आपल्या महिलांना भ्रष्ट केलं. त्यावेळी महिलांना वाचवण्यासाठी कडी लावली, घुंघट घालायला लावला. ती कडी आणि घुंघट 1947 साली उघडायला विसरले. आता तिचा घुंघट काढायला हवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महिलांच्या हाती सगळी सूत्रं सोपवण्याची वेळ आली
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महिलांच्या हाती सगळी सूत्रं सोपवण्याची वेळ आल्याचं पुरुषांनी ओळखायला हवं. महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला कर्तृत्वानं मोठ्या होत आहेत. प्रामाणिकता ही महिलांमध्ये जास्त आहे. महिलांचं कामाप्रती डेडिकेशन खूप चांगलं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आता तिथून जायला मुलं घाबरतात, मुली तिथं बसलेल्या असतात...
मी 1982 सालापासून पुण्यात येतोय. मी गंमतीने असं म्हणतो, एसपी कॉलेजच्या समोरुन जायला मुली घाबरायच्या, मुलं तिथं बसलेली असायची अन् चेष्टा करायची. आता तिथून जायला मुलं घाबरतात, मुली तिथं बसलेल्या असतात, असं ते म्हणाले. महिलांच्या हाती कारभार सोपवण्याची ही वेळ आहे, त्या उत्तमपणे चालवतील, असंही पाटील म्हणाले.
ही बातमी देखील वाचा