एक्स्प्लोर

Thane News : डोंबिवलीत खाडी किनाऱ्यावरील झाडाझुडपात अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; दोन नराधम गजाआड  

डोंबिवली शहरात असलेल्या ठाकुर्लीतील खाडी किनारी 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलीस असल्याचं खोटं सांगत दोन नराधमांनी  बलात्कार केल्याची धक्कादायक  घटना  घडली होती.

Thane Crime Updates : डोंबिवली शहरात असलेल्या ठाकुर्लीतील खाडी किनारी झाडाझुडपात भर दिवसा पोलीस असल्याचं सांगत एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी  बलात्कार केल्याची धक्कादायक  घटना  घडली होती. याप्रकरणी  विष्णू नगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल करून  दोन्ही नाराधमाचा शोध  सुरू केला. धक्कादायक बाब म्हणजे नराधम बलात्कार करतानाचे मोबाईलमध्ये  चित्रीकरण  करून पळून  गेले  होते. विष्णू  सुभाष  भांडेकर (वय 25, रा.  नेवाळी नाका, कल्याण पूर्व )  आशिष  प्रकाशचंद  गुप्ता ( वय, 32  रा.  डोंबिवली पूर्व ) असे मानपाडा पोलीस पथकाने शिताफीने शोध घेऊन 24 तासात अटक केलेल्या नराधमांची नावे आहे. 

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 27  जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी  आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. दोघे फिरत असताना दोन अनोखळी नराधम  त्या ठिकाणी आले. त्यानंतर दोघाही नराधमांनी पीडितेला आणि  तिच्या मित्राला पोलीस असल्याची थाप मारून  सांगितले कि, तुम्ही या ठिकाणी आलात तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगितलं जाणार आहे, असं बोलून त्यापैकी एका नराधम पीडित विद्यार्थिनीला खाडी किनारी काही अंतरावर असलेल्या झाडाझुडपात  घेऊन गेला. त्या निर्जनस्थळी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. एवढंच नव्हे तर त्या नरधामाने त्याच्याकडील मोबाईलमध्ये बलात्कार करतानाचे चित्रीकरण करून कुठंही या घटनेची वाच्यता केल्याचे व्हिडीओ व्हारयरल करण्याची धमकी दिली. तर दुसरा नराधम पीडितेसोबत असलेल्या मित्राला घेऊन ठाकुर्ली स्टेशन परिसरात आला. त्यावेळी त्या नराधमाने पीडितेच्या मित्राला सांगितलं की, आमचे साहेब त्या ठिकाणी बसले आहेत, तू चल त्यांच्याशी बोल. या दरम्यान पहिल्या नराधमाने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर दुसरा नराधम पीडितेच्या  मित्राला स्टेशन परिसरात सोडून पुन्हा खाडी किनारी आला आणि त्याने देखील त्या विद्यार्थिनीवर बळजबरीने बलात्कार केला. 

घडलेला प्रसंग  पीडित  विद्यार्थिनीने  आपल्या नातेवाईकांना सांगितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी पीडितेला घेऊन आधी हा प्रकार डोंबिवली जीआरपीला सांगितला. मात्र घडलेला  प्रकार  हा डोंबिवली पश्चिम भागातील  पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पीडित तरुणीला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. विष्णू नगर  पोलिसांनी काल रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणात अनोखळी दोन नराधमांवर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

माहितीच्या आधारे विष्णू नगर  आणि मानपाडा  पोलिसांनी नराधमांना  शोधण्यासाठी पाच पथक तयार केली. त्यानंतर  स्टेशन परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये नराधमांची ओळख पटवून आणि तांत्रिक तसेच गुप्त बातमीदारांचे मदतीने  दोन्ही  नराधमांना मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे आणि वनवे यांनी त्यांच्या पथकासह दोघांना 24  तासातच बेड्या ठोकल्या.

दरम्यान, विष्णू सुभाष भांडेकर हा नराधम बिगारी कामगार असून पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात आणखी काही गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. तर आशिष प्रकाशचंद गुप्ता हा नराधम डोंबिवली पूर्वेडील एका चहाच्या टपरीवर कामाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Salman Khan Birthday: इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
WTC Point Table : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Embed widget