एक्स्प्लोर

Raju Shetti : कॅनॉलचे अस्थिरीकरण 15 वर्ष सत्तेत असताना का केलं नाही?; राजू शेट्टीचा अजित पवारांना सवाल

कॅनॉलचे अस्थिरीकरण गरजेचं होतं तर 15 वर्ष सरकार होत तेव्हा का केलं नाही? अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो. तो का असतो हे सांगण्याची गरज नाही, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे.

Raju Shetti : कॅनॉलचे अस्थिरीकरण गरजेचं होतं तर 15 वर्ष सरकार होत तेव्हा का केलं नाही? अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो. तो का असतो हे सांगण्याची गरज नाही. इंग्रजांनी ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात कॅनॉलने पाणी नेले. कॅनॉलच्या आसपास 20 किलोमीटर वरील विहीरांना त्या पाण्याचा फायदा होतो. कॅनॉल हा उंचावर असतो. आता धरणे फुटत आहेत. फुटण्याच कारण सांगितले जात की खेकडयाने धरण फोडलं. 15 वर्ष सरकार होत तेव्हा कॅनॉलचे अस्थिरीकरण का केलं नाही?, असा जाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना नाव न घेता (Ajit pawar) विचारला आहे.

शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा उद्योग कोणी केला हे आम्हाला चांगलं माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा कालवा चालू आहे. आत्ताच हा कालवा तयार झाला, असं काहीही नाही. मुळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जे पाणी शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी आरक्षित होतं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बिगर शेती करण्यासाठी वापर झाला आहे. त्यानंतर शेतीला पाणी कमी पडल्यानंतर त्याचं खापर गळतीवर फोडलं गेलं, असं म्हणत राजू शेट्टी  यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

इंग्रजाच्या काळात बांधलेले कालवे अजूनही अतिशय उत्तम प्रतीचे आहेत.मात्र अलीकडच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये जे कालवे बांधलेत, त्यांची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. विकासकाम करण्यापेक्षा विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्यामध्ये सगळ्यांचा रस आहे. त्यातूनच हे शंभर सव्वाशे कोटी रुपयांचे ठेके द्यायचे. यात कुठेही शेतकरी हित नाही. शेतकरी हे खपवून घेणार नाही. या सर्वांची पाळेमुळे शोधून त्यातला खलनायक कोण आहे हे सुद्धा लवकरच बाहेर काढणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

महाविकास आघाडी सरकारनं एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं शेतकऱ्यांना कारखाने बंद होऊनही एफआरपीची रक्कम मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर, याबद्दल न्यायालयात दाद मागितली. कारखानदार भामटे आहेत, चोर आहेत. हे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणार नाहीत. त्यामुळे एकरकमी एफआरपीची आमची मागणी आहे. आगामी गळीत हंगामात एकरक्कमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  साखर आयुक्त त्यांच्या चौकटीमध्ये काम करतात. मुळातच या साखर कारखानदारांना महाविकास आघाडीने एफआरपीचे तुकडे करायला परवानगी दिली, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Embed widget