एक्स्प्लोर
बिल्डर डी. एस. कुलकर्णी कार अपघातात जखमी, चालकाचा मृत्यू

पुणे : सुप्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला बुधवारी रात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. यात त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला, तर डी. एस. कुलकर्णी जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबईहून पुण्याला जाताना खंडाळा एक्झिटजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या डाव्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर कुलकर्णींना तात्काळ लोकमान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये तिघे जण होते. बिल्डर दीपक सखाराम कुलकर्णी हे डी. एस. के या नावाने सुप्रसिद्ध आहेत. 'घराला घरपण देणारी माणसं' हे डी. एस. केंचं घोषवाक्य आहे. डीएसकेंचा अनेक उद्योगांमध्ये विस्तार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























