एक्स्प्लोर

कॉलेजमध्ये लेक्चर बंक कराल, तर थेट पालकांना मेसेज

पिंपरी : महाविद्यालयात लेक्चर बंक करुन मुलींची छेडछाड करण्याची जणू फॅशनच निघाली आहे. अशा टवाळखोरांना जरब बसवताना कॉलेज प्रशासनाची दमछाक होते. पिंपरी चिंचवडमधील प्रतिभा महाविद्यालयाने मात्र यावर जालीम उपाय शोधला आहे. लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या थेट पालकांनाच मेसेज जाणार आहे.   लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन थेट पालकांच्या कानावर पाल्यांचे प्रताप घातले जाणार आहेत. बारकोड स्कॅनर मशिन प्रतिभा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. हे बारकोड म्हणजे एक प्रकारचं आयकार्ड आहे.   विद्यार्थ्यांना हे बारकोड असलेलं आयकार्ड घेऊन लेक्चरला बसणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या आयकार्डवरील बारकोड या मशीनद्वारे स्कॅन करुन विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. त्यानंतर तो सर्व डाटा महाविद्यालयाने बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये घेतला जातो आणि गैरहजर विध्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी लेक्चरला बसला नसल्यास, त्याची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाते.   महाविद्यालयाकडून गैरहजरीची माहिती थेट पालकांना कळवली जात असल्यानं विद्यार्थ्यांनी वर्ग भरल्याचं चित्र आहे. महाविद्यालयानं सुरु केलेल्या या उपक्रमाचे स्वागत काही विद्यार्थ्यांनी केलं आहे तर विद्यार्थिनींनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशी हजेरी गरजेची असल्याच मत व्यक्त केलं आहे. पालकांना संपूर्ण माहिती मिळत असल्यानं पालकांची चिंता कमी झाल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. यामुळे अनुचित प्रकार कमी घडतील असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.   बारकोड पद्धतीच्या या आयकार्डद्वारे त्यांच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती देखील प्राप्त होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अपघात झालाच तर रुग्णालयातील यंत्रणेला त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या आयकार्ड द्वारे त्यांना प्राप्त होणार आहे. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील चाळीस रुग्णालय या सिस्टीमशी त्यांनी अटॅच केली आहेत.     प्रतिभा महाविद्यालयानं विध्यार्थ्यांच्या हजेरीसाठी सुरु केलेली हि बारकोड पद्धत नक्कीच कौतुकास्पद आहे. हीच पद्धत राज्यातील सर्व महाविद्यालयानं सुरु केली तर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षणाचा टक्काही वाढेल. तसेच यामुळे निदान महाविद्यालयांमध्ये शिक्षण घ्यायला आलेल्या मुली तरी सुरक्षित राहतील आणि पालकांची चिंताही दूर होईल, हे मात्र निश्चित. तेव्हा पालक, विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि सरकारने सर्व महाविद्यालयात हजेरीसाठी बारकोड पद्धत अवगत करण्याचा आग्रह धरणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget