एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; 11जूनला होणार प्रस्थान

Ashadhi Wari 2023: देहू देवस्थाननंतर आता आळंदी देवस्थानने ही आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला आळंदीमधून प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करून 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहचेल

Ashadhi Wari 2023 : देहू देवस्थाननंतर आता आळंदी देवस्थानने (Alandi Devasthan) ही आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Palkhi) 11 जूनला आळंदीमधून (Alandi) प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी (Vitthal) भेट घडेल. वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कसा असेल आषाढी वारी पालखी सोहळा?

सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम, 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि 22 जूनला फलटणमध्ये मुक्काम, 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे.

Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; 11जूनला होणार प्रस्थान

21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल. दिनांक 3 जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पांढरी नगरीत विसावेल. 3 जुलैला गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे निघणार आहे. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त मंडळ यांचे मार्गदर्शनात सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. वारकरी भाविक यांची सोहळ्यात गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान

यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात. मागील वर्षी कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर पारंपरीक पद्धतीने वारी सुरु करण्यात आली होती. इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain: सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कोकणात जोरदार हजेरी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कोकणात जोरदार हजेरी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Embed widget