Ashadhi Wari 2023: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान
Sant Tukaram Palkhi : यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.
![Ashadhi Wari 2023: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान Ashadhi Wari 2023 Sant Tukaram Maharaj Palkhi will start on 10th June from Dehu and reach at padharpur on 28th June 2023 Pandharpur Maharashtra Ashadhi Wari 2023: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/7d8d2f7ccc2f8bfc1db7f018de441d8c1680956637954290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashadhi Wari 2023: महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.
संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात. मागील वर्षी कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर पारंपरीक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली होती. इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम करणार आहे.
यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. तर, 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे. अन प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यात म्हटले होते. पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती.
या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेण्यात येत आहे. या पालखी मार्गावर ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)