एक्स्प्लोर

येरवडा जेलमध्ये नेऊन डीएसकेंच्या मेहुणीची चौकशी

डी. एस. कुलकर्णी आणि या प्रकरणातील इतर आरोपींसमोर त्यांची चौकशी करण्यात आली.

पुणे : डी. एस. कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आज आर्थिक गुन्हे शाखेकडून येरवडा कारागृहात नेण्यात आलं. डी. एस. कुलकर्णी आणि या प्रकरणातील इतर आरोपींसमोर त्यांची चौकशी करण्यात आली. गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनुराधा पुरंदरे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना चार जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पोलिस कोठडी दरम्यान अनुराधा पुरंदरे यांची डीएसके आणि इतर आरोपींसमोर चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पोलिस आज दुपारी अनुराधा पुरंदरे यांना येरवडा कारागृहात घेऊन गेले. गुंतवणूकदार, बँक आणि डिबेंचर्स यांची दोन हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, डीएसकेंची पुतणी सई वांजपे, सई वांजपेचा नवरा केदार वांजपे, कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना या आधीच अटक करण्यात आली आहे. अनुराधा पुरंदरेंकडे या डीएसकेंच्या कंपन्यांची 1986 पासून फायनान्स विभागाची जबाबदारी होती. डी एस कुलकर्णी यांच्या मेहुणीला अटक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना 28 मे रोजी अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने निगडीमधून अनुराधा पुरंदरेंना बेड्या ठोकल्या. डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत अनुराधा पुरंदरेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात अनुराधा पुरंदरेंचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अनुराधा पुरंदरे गायब झाला होत्या. तपास पथकांना सापडत नव्हत्या. पण त्या निगडीमध्ये एका कुटुंबीयांकडे राहत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांना 28 मे रोजी अटक करण्यात आली. डीएसके दाम्पत्याच्या अटकेनंतर जावईही पोलिसांच्या जाळ्यात आतापर्यंत सात जण अटकेत या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ही सातवी अटक आहे. याआधी डी एस कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, पुतणी सई वांजपे, तिचा पती केदार वांजपे (जावई), डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर आणि फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर मुलगा शिरीष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 5 जूनला सुनावणी होणार आहे. 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसकेंवर तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. डीएसके दाम्पत्याविरोधात 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र कुलकर्णी दाम्पत्य येरवडा तुरुंगात डीएसके आणि हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून  17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. संबंधित बातम्या डीएसके आणि हेमंती कुलकर्णींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला एसीत वावरणारे 'हे' सेलिब्रेटी आता जेलमध्ये घामांच्या धारांत बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली! डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर "डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी! बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget