एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्स रॅकेटचं गोवा कनेक्शन उघड; सांगलीतून थेट गोव्यात सुरु होता ड्रग्स पुरवठा

सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मोठा प्रमाणात ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पुणे : देशातील सर्वात   (Pune Crime News)  मोठं ड्रग्स रॅकेट  (Pune Drugs)   पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. आतापर्यंतच तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज (Mephedrone) पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. याचं सांगली कनेक्शनदेखील समोर आलं होतं. यातच सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मोठा प्रमाणात ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या पुणे गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 300 कोटींचे 140 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं.  तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला होता. यामध्ये 140 किलोची ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 300 कोटींच्या आसपास किंमत असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. पुणे पोलीस आणि सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी मीठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आलं होतं. यातील काही माल हा गोव्यात विक्रीसाठई पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

सांगतील अटक करण्यात आलेला आयुब मकानदारवर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता. तसेच तो सात वर्ष येरवडा कारागृहात होता. कारागृहात पुण्यातील आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती. त्यामुळे मकानदारकडे हा साठा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता याची माहिती मिळताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी छापेमारी केली होती. 

पुणे पोलिसांच्या कोणत्या कारवाईत किती ड्रग्ज जप्त करण्यात आले?

-दिल्लीत 600 किलो एम डी ड्रग्ज जप्त, दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
-तीन 4 हजार कोटी रुपयांचे 2 हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त 
-पुणे पोलिसांकडून पुणे, कुरकुंभसह दिल्लीत छापेमारी
-सोमवार पेठेतील छापेमारीमध्ये 2 किलो जप्त 
-विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो ड्रग्ज जप्त
-कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त 
-दिल्लीत 800 कोटी रुपयांचे 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त 
-आणखी एका कारवाईमध्ये दिल्लीत 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो ड्रग्ज जप्त 

इतर महत्वाची बातमी-

Pune Drugs Racket : देशातील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट पुणे पोलिसांनाकडून उघड ; पुणे ड्रग्स रॅकेटचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता

 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget