(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Drugs Racket : देशातील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट पुणे पोलिसांनाकडून उघड ; पुणे ड्रग्स रॅकेटचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता
देशातील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. आतापर्यंतच तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्स रॅकेटचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता आहे.
पुणे : देशातील सर्वात (Pune Crime News) मोठं ड्रग्स रॅकेट (Pune Drugs) पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. आतापर्यंतच तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज (Mephedrone) पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. यातच दिल्लीत केलेल्या (Pune Drug Racket Bust) छापेमारीत आरोपींना पुणे पोलिसांनी पुण्यात आणलं आहे. या सगळ्यानंतर आता देशातील सगळ्यात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी ड्रग्स रॅकेट उघड केल्यानंतर एका एका शहराचे कनेक्शन उघड झाले. त्यात पुणे पोलिसांनी थेट दिल्लीत छापेमारी केली होती. त्या 970 किलो ड्रग्स जप्त केलं होतं आणि तीन आरोपींना अटक केली होती. दिवेश भुतीया, संदीप कुमार, संदीप यादव अशी या तिघांची नावं होती. या तिघांनाही आता पुणे पोलिसांनी दिल्लीहून पुण्यात आणलं आहे. कालरात्री पुणे पोलिसांनी विमानाने त्यांना पुण्यात आणलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील हे तिघं दिल्लीतून हे रॅकेट चालवत होते. दौंडमधील कुरकुंभ MIDC तील कारखान्यातून हे तिघं ड्रग्स मागवून ते अनेकांपर्यंत पुरवत होते.
या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसीया (वय 35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय 46, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (वय ३९) आणि संदीप कुमार (वय ४२, दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.
दुबई कनेक्शन उघड होण्याची शक्यता
या रॅकेटची आतापर्यंत दिल्ली, लंडन, सांगली, कुरकुंभ कनेक्शन पुढे आलं आहे. त्यात हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचंही समोर आलं आहे. आता मात्र या ड्रग्स रॅकेटचं दुबई कनेक्शन पुढे येण्याची शक्यता आहे. दिल्लीहून पुण्यात आणलेल्या तीन आरोपींची आता पुणे पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यासोबतच NIA च्या काही टिम्स यांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून या रॅकेटची अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-