Crime News: पुणं हादरलं! प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने वार करत तरुणीची हत्या; आरोपी फरार
Pune : पुण्यात तरुणीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

Pune Crime News: पुण्यात (pune) तरुणीवर धारदार शस्त्राने(Pune crime) वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे. प्रेम प्रकरणाच्या (Crime news) वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. श्वेता रानवडे असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. श्वेताच्या हत्येमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता रानवडेचा आणि एका तरुणाचा बुधवारी प्रेमप्रकरणावरुन वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला. त्याचवेळी तरुणाने जवळ असलेले शस्त्र काढून तिच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. यात तरुणी गंभीर जखमी झाली. वार केल्यानंतर संबंधित तरुण पसार झाला. तरुणी रक्ताने माखलेली होती. त्यावेळी तरुणीला उपस्थित लोकांनी तातडीने नेण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पसार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
वादानं घेतला जीव -
श्वेता औंध परिसरात राहायला होती. बुधवारी दुपारी दोघेजण भेटले होते. त्यावेळी दोघांमध्ये प्रेम प्रकरणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. दोघांनीही एकमेकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र वाद एवढा वाढला की तरुणाला राग अनावर झाला. रागाच्या भरात तरुणाने खिशात असलेलं धारदार शस्त्र काढलं आणि तरुणीच्या अंगावर धावून गेला. तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी अपयशी ठरली. यात तरुणीच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. प्रेयसी गंभीर जखमी झाल्याचं लक्षात येताच आरोपी प्रियकरानं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर उपस्थितांची तिथं गर्दी झाली, गर्दीमधील काही लोकांनी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
तरुणांना भीती नेमकी कशाची?
पुण्यात क्षृल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. पुण्याच्या बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आलेत. पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. पुण्यातील बावधन परिसरात या हत्येमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे तरुणांना भीती नेमकी कशाची हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
