एक्स्प्लोर

Pune Crime : जुन्या वादातून केलेल्या मारहाणीचा घेतला असा बदला; कोयत्याने गळ्यावर केला एक वार अन्....पुण्यातील घटना

Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे: पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. पुणे शहर परिसरात रोज खुन, हत्या, बलात्काराच्या (Pune Crime News) घटना उघडकीस येत आहेत. दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या करण्यात आली. त्यानंतर सासवड रस्त्यावर हडपसर भागामध्ये अगदी क्षुल्लक कारणास्तव म्हणजे हॉटस्पॉट न दिल्याने एका व्यक्तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घडामोडी घडत असतानात काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या (Pune Crime News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. गुलटेकडी येथे ही घटना घडली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हत्या झालेल्या तरूणाचं नाव सुनील सरोदे असं आहे. तर रोहन कांबळे, शिवशरण कांबळे या दोघा भावांनी मिळून सुनील सरोदेची हत्या केली आहे. जुन्या वादातून सुनील सरोदेचा जीव घेतला असल्याची माहिती आहे. रोहन कांबळे, शिवशरण कांबळे असे ताब्यात केलेल्यांची नावं आहेत. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Crime News) असल्याची माहिती समोर आली आहे. साहिल मोक्का मधून 2023 मध्ये जामिनावर बाहेर आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्का मधून जामिनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी सुनील सरोदे याची हत्या केली. ही हत्या जुन्या वादातून केल्याचं समोर आलं आहे. 7 जुलै रोजी आरोपी रोहन कांबळेचा वाढदिवस होता. त्यावेळी मृत सुनील सरोदेने त्याला मारहाण केली होती. त्या रागातून काल (मंगळवारी) रात्री रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी नील सरोदेच्या घरी जाऊन सुनीलचा भाऊ गणेश याला मारहाण (Pune Crime News) सुरू केली. त्यावेळी सुनील मध्ये आला. आरोपीने कोयता काढून त्याच्या गळ्यावर वार केला. हा घाव वर्मी बसला आणि त्याचा जागीच मृत्यू (Pune Crime News) झाला. यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
 
रोहन कांबळे, शिवशरण कांबळे हे दोघे ही नुकतेच जामीनावर बाहेर आलेले आरोपी आहेत. या घटनेनंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात भररस्त्यावर छेडछाडीचा संतापजनक प्रकार! 

पुण्यात सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना, स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, या प्रकारानंतर पुण्यात पोलिसांचा (Pune Police) धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तर आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कृष्णा बाबूराव सावंत (वय 25, रा. वांजरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Embed widget