Baramati Lok Sabha Election: पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकाचं निलंबन, मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत खुली होती बँक
Baramati Lok Sabha Election: निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे (PDCC Bank) मॅनेजर तलवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून (Election Commission) विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान झाले. त्याच्या आदल्या रात्री वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँकेची शाखा पहाटेपर्यंत सुरु असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. आमदार रोहित पवारांनी बॅंकांतून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानं तर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
पीडीसीसी बँक बारामतीच्या मतदानाच्या आदल्या मध्यरात्रीपर्यंत चालू होती, अशी तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले आणि व्यवस्थापकाचे निलंबन केले. निवडणूक आयोगाकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने सहकार्य केलं नाही. सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. कारवाई केली.
बारामती मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबात जोरदार वाकयुद्ध
बारामती मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबात जोरदार वाकयुद्ध झालं. आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेली अजित पवार आणि रोहित पवारांची आक्रमकता बारामतीकरांनी मतदानाच्या दिवशी अनुभवली. रोहित पवारांनी एक ट्वीट करत याची सुरुवात केली. भोरमध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते पैसा वाटत असल्याचा दावा करत रोहित पवारांनी एक व्हिडीओ ट्विट केला. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले. तर दुसऱ्या व्हिडीओत वेल्हे गावातली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्रीच्या सुमारास सुरु असलेली दिसत होती. बँक रात्री 1 वाजताही का सुरु ठेवली असा सवाल रोहित पवारांनी विचारला. बँकेतून पैसे वाटप केल्याचा आरोपही त्यांनी अजित पवारांवर केला होता. पैसेवाटप, दमदाटीचा आरोप आणि वैयक्तिक हेव्यादाव्यांमुळं आज बारामतीत मतदानाचा दिवस गाजला..
Video :