Navneet Rana On Amravati MP : ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राजीनामा द्या, नवनीत राणांचं आव्हान
Navneet Rana On Amravati MP : ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राजीनामा द्या, नवनीत राणांचं आव्हान
महाविकास आघाडीला EVM मशीनवर शंका असेल तर अमरावतीचे खासदार यांनी राजीनामा द्यावा आणि बँलेटवर निवडणूक घ्यावी बडनेरा विधानसभेतून निवडून आलेले रवी राणा हे पण राजीनामा देतील तिथं पण बँलेटवर निवडणुका होऊन जाऊद्या मग कळेल... भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांचा महाविकास आघाडीला आवाहन...
हे ही वाचा...
"विधानसभेच निवडणूक आमच्यासाठी नॉर्मल नव्हती. काँग्रेसचा पूर्ण अटॅक माझ्यावर होता. रेवंत रेड्डी यांच्याकडे केवळ आणि केवळ भोकर विधानसभेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे दोन मंत्री मतदारसंघात बसून होते, प्रचंड पैसा होता. अशा पद्धतीने फोकस करुन आमच्यावर अॅटॅक झाला", असं भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते : अशोक चव्हाण अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, मी निवडणूक लढली तेव्हा समीकरणं वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामावर होता. मी मतदारसंघात प्रचंड काम केललं आहे. पण फक्त काम चालतं असं नाही. सोशल मीडियावर होणार प्रचार, तिथे आपल्याबद्दल चालणार अपप्रचार तरुण वर्गाच्या आता वेगळ्या अपेक्षा असतात. ज्या मंडळींना मीच मोठं केलं, तेच या निवडणुकीत माझ्या विरोधात उभा होते. मला विरोधक नवखा नव्हता. मी पहिली निवडणूक लढलो त्यावेळी विरोधक विरोधी पक्षातले होते. या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते.