एक्स्प्लोर

आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य

Ramdas Athawale on Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे, असे म्हटले होते.

Ramdas Athawale on Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मनसेने (MNS) 'एकला चलो रे'चा नारा दिला. मात्र, मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे वक्तव्य केले. यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे. 

रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली. आमच्याशिवाय सरकार येणार नाही, असे ते बोलले होते. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्या जागा निवडून येत नाही.  राज ठाकरे युतीत येतील असे मला वाटत नाही. मी आहे तर त्यांची गरज काय? असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

त्यांच्या झेंड्याचा रंग बदललाय

राज ठाकरे यांना सोबत घेणे योग्य ठरणार नाही.  मुस्लिम विरोधी भूमिका घेणे योग्य नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा, हिरवा रंग होता. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे. आता त्यांनी भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिम विरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तानला बळ देतात त्याच्या विरोधी आम्ही आहोत. मुस्लिम आपले बांधवच आहेत.  योगीजी बोलले होते बटेंगे तो कटेंगे हा अर्थ असा की, मोदींना पाठिंबा देणारे एकत्र या, असेही रामदास आठवले यांनी म्हटले. 

भाजपकडून मनसेला रिटर्न गिफ्ट? 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेला (MNS)  विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आणखी वाचा 

घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget