एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मला कोणालाही दुखवायचं नव्हतं, जे काही केलंय ते पवार साहेबांच्या परवानगीनेच केलंय, अजित पवारांची स्पष्टोक्ती

शाल देताना आयोजकांनी काटकसर केली, काटकसर करणं चागलं, पण आम्ही पेशंट म्हणून आल्यावर पण गोळ्या देतांना काटकसर करा अशी कोपरखळी अजित पवारांनी मारली.

पुणे : आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते. तसंच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला. 

अजित पवार म्हणाले,  मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली.  ते सुरुवातीला  हो म्हणाले परत म्हणाले की ही,  भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. पण हे सगळे होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.

सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले... कधी न दिसणारे परंतु आता साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले.. ते म्हणतात ना  पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही... सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे, असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात : अजित पवार

 आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले .   मी मधल्या काळात पक्क ठरवलं होतं की बास झाले आता... पण  कधी ना कधी थांबावं लागते, पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात. आजपर्यंतचा तुम्हाला अनुभव त्यासंदर्भात मी पुन्हा विचार करायला लागलो आहे. 

गोळ्या देतांना काटकसर करा, अजित पवारांची डॉक्टरांना कोपरखळी

1967 पासून आजपर्यंत काही मिळाले नाही आता मिळतंय ते घ्या म्हणावं. इतक्या वर्ष मत देत आलेलो आहे त्यामुळे मिळतय ते घ्या, असे तुमचे पेशंटला सांगा असे देखील अजित पवार म्हणाले. शाल देताना आयोजकांनी काटकसर केली,  काटकसर करणं चागलं, पण आम्ही पेशंट म्हणून आल्यावर पण गोळ्या देतांना काटकसर करा, अशी कोपरखळी डॉक्टरांना अजित पवारांनी मारली. 

सुप्रियाच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक : अजित पवार

गेल्या वेळची परिस्थिती वेगळी होती. साहेबांच्या वयाचा विचार करत  लोकसभेला सुप्रिया सुळे मतदान करायचे मानसिकता बारामतीकरांची होती. शेवटी मतदाराला अधिकार आहे.   सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी मान्य केली. आता मागचे सर्व विसरुन पुढे जायचे, असे अजित पवार म्हणाले.  

हे ही वाचा :

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget