Aba Bagul: आबा बागुल पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात, विधानसभा निवडणकीसाठी इच्छुक
Aba Bagul: आबा बागुल आज शरद पवार यांच्या भेटीला बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आलेले आहेत. ते या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
पुणे: आगामी निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी तयारी सुरू केली आहे, कोणत्या पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्याची चाचपणी सध्या सुरू असल्याचं चित्र आहे, अशातच नेत्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे, अशातच पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचले आहे. लोकसभा निवडणुकीआधी आबा बागुल यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता आबा बागुल आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आलेले आहेत. ते या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
आबा बागुल (Aba Bagul) हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक आहेत. याआधी देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी आबा बागुल म्हणाले होते, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून पर्वतीची जागा ही काँग्रेसला सोडावी अशी विनंती आबा बागुल (Aba Bagul) यांनी शरद पवारांकडे केल्याची माहिती गेल्या भेटीवेळी दिली होती. त्यावर शरद पवारांनी निवडून येणार सीट असेल तर नक्की याबाबत विचार करू असा आश्वासन दिलं असल्याचं बागुल यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.