Pune Grampanchayat Election: पुणे जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख जाहीर
पुणे जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत़. त्यासाठी 4 ऑगस्टला मतदान होईल. त्यानुसार 5 जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Pune Grampanchayat Election: जानेवारी 2019 ते 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत़. त्यानुसार 5जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहेत. त्या तालुक्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 2055 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. 4 ऑगस्टला मतदान होईल. 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आणि 11 ऑगस्टला निवडणुक निकालाची अधिसुचना जारी केली जाईल.
पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, बारामती, पुरंदर, इंदापूर या पाच तालुक्यातील ग्रामपंचायतीत निवडणुका होतील. हवेलीत 5, शिरूर 6, बारामती 2, पुरंदर 2, इंदापूर 4 या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये यंदाल निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे.
दरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती बघून आयोगाने 2055 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम दिला होता. त्यानुसार कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत किंवा तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबवावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
दरम्यान सादर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून 05 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत हि निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 05 जुलै रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. 12 ते 19 जुलै नाम निर्देशनपत्र मागवणे, सादर करणे, 20 जुलै रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी, 22 जुलै रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेणे, 22 जुलै रोजी दुपारी तीन नंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, 04 ऑगस्ट रोजी आवश्यक असल्यास मतदान, 05 ऑगस्ट रोजी मतमोजणी व निकाल घोषित करणे, 11 ऑगस्ट रोजी निकालाची अधिसूचना काढणे.