पुण्यातील चाकणमध्ये अंडी विक्रेते होम क्वॉरन्टाईन, 181 जणांच्या हातावर शिक्के
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या विक्रेत्यास तो कोणाच्या संपर्कात आला तसेच त्याने कोणकोणत्या भागात अंडी सप्लाय केल्याची माहिती घेण्यात आली. त्यात चाकणमधील चार परिसराचा संबंधित रुग्णाने उल्लेख केला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड लगतच्या चाकणमधील अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. 81 दुकानांमधील 181 जणांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात आले आहेत. एका अंडी विक्रेत्याला कोरोनाची लागण झालेली आहे, ती व्यक्ती या दुकानदारांना अंडी सप्लाय करत होती. म्हणून जिल्हा प्रशासन आणि खेड तालुका प्रशासनाने होम क्वॉरन्टाईनची प्रक्रिया सुरु केली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या विक्रेत्यास तो कोणाच्या संपर्कात आला तसेच त्याने कोणकोणत्या भागात अंडी सप्लाय केल्याची माहिती घेण्यात आली. त्यात चाकणमधील चार परिसराचा संबंधित रुग्णाने उल्लेख केला. त्यानुसार नानेकरवाडी आणि खराबवाडीत काल प्रशासनाने प्रत्येक दुकानात जाऊन चौकशी केली. तेव्हा 81 दुकानांमध्ये अंडी पुरवठा केल्याचं दिसून आलं. त्यानुसार दुकान मालक, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अशा 181 जणांना होम क्वॉरन्टाईनच्या सूचना देण्यात आल्या. तसे शिक्केही प्रत्येकाच्या हातावर मारण्यात आले, सध्या हे सर्व घरी असले तरी आरोग्य विभाग त्यांची वेळोवेळी तपासणी करत आहे.
Coronavirus | पुण्यातील चाकणमध्ये अंडी विक्रेते होम क्वॉरन्टाईन, 181 जणांच्या हातावर शिक्के
तर आज मेदनकरवाडी आणि कराचीवाडी या उर्वरित भागातील आणखी अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे आज होम क्वॉरन्टाईनचा आकडा वाढणार आहे. सुदैवाची बाब ही आहे की कोरोनाग्रस्त अंडी पुरवठा धारकाचा कर्मचाऱ्यांचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र तरीही खबरदारी म्हणून चार ही परिसरातील अंडी विक्री बंद करण्यात आली. रात्रीच प्रशासनाने स्पीकरवरुन अंडी विक्री बंद करण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. नागरिकांना ही आहारात अंडी सेवन न करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात आज कोरोनाच्या 170 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2801 वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक मुंबईत 66 जणांची नोंद झाली. तर, त्याखालोखाल 44 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत सापडले आहेत.
संबंधित बातम्या :