एक्स्प्लोर

लॉकडाऊन 2 : विनाटायरच्या सायकलवरुन तरुण दिल्लीच्या दिशेने; 1500 किलोमीटरचा खडतर प्रवास

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी एका तरुणाने चक्क सायकलवरुन प्रवास सुरू केलाय. तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास हा तरुण सायकलवरुन करणार आहे. 80 किलोमीटरच्या प्रवासनंतर त्याच्या सायकलचा टायर फुटला. मात्र, काहीच व्यवस्था नसल्याने तो तशाच सायकलवरुन जात होता.

पालघर : लॉकडाऊनमुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत परराज्यातील कामगार आपल्या गावी जात असल्याचं दिसून आलं आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील कुडूस या गावात निदर्शनास आली. चक्क टायर नसलेल्या सायकलवरून एक युवक मनोरच्या दिशेने निघालेल्या काही ग्रामस्थांना दिसला. विचारपूस केली असता तो दिल्ली येथील आपल्या गावी जात असल्याचे त्याने सांगितले. मुंबईसह उपनगरातील भागात हजोरांच्या संख्येने परप्रांतीय अडकले आहेत. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपेल या आशेवर ते दिवस काढत होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने येथील कामगारांचा संयम तुटत चालला आहे. परिणामी घरी जाण्यासाठी आता ते वेगवगेळे मार्ग अवलंबवताना दिसत आहेत.

नवी मुंबई कोपर खैरणे येथून सोमवारी सकाळी सात वाजता सायकलवरून तो युवक दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाला होता. सकाळी अकराच्या सुमारास तो कुडूस येथून जात असताना त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. नवी मुंबई येथील कपिल हेयर सलून येथे काम करणारा तो युवक सकाळी सात वाजता अडगळीस पडलेली मित्राची सायकल घेऊन निघाला होता. दरम्यानच्या 80 किलोमीटरच्या प्रवासातच त्याच्या सायकलचे पुढचे टायर फुटले व प्रवासादरम्यान ते जीर्ण होऊन निघून पडले. कोपर खैरणे ते दिल्ली हा 1500 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यासाठी निघालेल्या त्या युवकाला कुडूस येथील कइस पटेल, रुकसाद शेख व स्वप्नील जाधव या युवकांनी थांबवले. उपाशीपोटीच निघालेल्या त्या युवकाला खाण्यापिण्यासाठी दिले. गावातीलच एका सायकल दुकानदाराकडून स्वखर्चाने ट्यूब व टायर बसवून दिले.

Coronavirus | राज्यात आज 170 नवे कोरोना बाधित; रुग्णांची संख्या वाढून 2801 वर

प्रप्रांतिय कामगारांचा संयम सुटतोय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात जाहीर झाला. अचाकन लॉकडाऊन जाहीर झाल्याने हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. या कामगारांची सोय आम्ही करू असं प्रत्येक राज्य सरकार सांगत आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोनतीन दिवसात दिल्ली, राजस्थान, गुजराज, महाराष्ट्र, तेलंगाणा या राज्यांच्या सीमाभागात हजारो कामगार घरी जाण्यासाठी जमा झालेले दिसले. प्रशासनाने यावर कसेतरी नियंत्रण मिळवण्यात यश आले. हळूहळू दिवस जात होते. 14 दिवसांनंतर लॉकडाऊन संपेल आणि आपण घरी जाऊ या एकाच आशेवर अनेक कामगार धीर धरुन होते. परंतु, लॉकडाऊन पुन्हा तीन मे पर्यंत वाढवल्यामुळे या कामगारांचा संयम सुटत चालला असल्याचे बोलले जात आहे.

Curfew In Malegaon | मालेगावमध्ये संचारबंदी लागू, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Salman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget