(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : मुंबईतील सहा जागांसाठी उद्या मतदान, पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी
Mumbai : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) सोमवारी (दि.19) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Mumbai : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) सोमवारी (दि.19) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणूक (Loksabha Election) 2024 च्या अनुषंगाने ठाणे व पालघर लोकसभा मतदारसंघात सोमावारी मतदान होणार आहे. पुणे, कोकण, गोवा, बाजूकडून येणाऱ्या वाहनाचा मुंबई व गुजरातच्या दिशेने वाहनाचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्फत वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये
वाहतुकीबाबतच्या अधिसूचनेनुसार, दिनांक 20/5/2024 रोजी सकाळी 06.00 वा. पासून ते 24:00 वाजेपर्यंत या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी (पार्क) करण्यास पूर्णत: बंदी राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश नसल्याने जड अवजड वाहनांनी (दि. 20)रोजी 06.00 वाजता पासून 24.00 वाजेपर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.
राज्यातील 13 जागांसाठी होणार मतदान
मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.
मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात
मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित 4 जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोनहात करणार आहेत. महायुतीमध्ये 3 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता.
मुंबईतील 6 जागांवर कोणाला उमेदवारी ?
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव - शिवसेना विरुद्ध शिवसेना
दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई - शिवसेना विरुद्ध शिवसेना
उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील - भाजप विरुद्ध काँग्रेस
उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड - भाजप विरुद्ध काँग्रेस
उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील - भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना
वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर - शिवसेना विरुद्ध शिवसेना
इतर महत्वाच्या बातम्या