एक्स्प्लोर
Maharashtra Bandh | बंद यशस्वी, कुणावरही जबरदस्ती नाही, हिंसाचार नाही, प्रकाश आंबेडकरांचा दावा
सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद दुपारी ४ वाजता मागे घेण्यात आला. तशी घोषणा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
मुंबई : वंचित बहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला असून जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. आम्ही या बंदसाठी कुणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि 35 संघटना मिळून बंद जाहीर केला होता. त्याला इतर 100 संघटनांनी देखील पाठिंबा दिला. आम्हाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. बंद दरम्यान अमरावतीच्या पकडलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून दिलं आहे. घाटकोपरला बसवर दगड मारणारा तोंडाला रुमाल बांधून होता. तो कोण आहे याचा पोलीस तपास करत आहेत. पालघरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने जबरदस्ती दुकान उघडण्यास भाग पाडले, अशी माहिती त्यांनी दिली. बंद दरम्यान ज्यांना ताब्यात घेतलं त्यांची संख्या तीन ते सव्वा तीन हजार आहेत. मुंबई ठप्प पडली हा दावा फेल गेलेला नाही. यासाठी आम्हाला कुणालाही जबरदस्ती करायची नव्हती, असेही ते म्हणाले.
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी द्या : प्रकाश आंबेडकर
आंबेडकर म्हणाले की, लोकांच्या एनआरसी आणि सीएएबाबत जागृती होईला सुरुवात झालीय त्यामुळेच बंदला पाठिंबा मिळाला. एनआरसी आणि सीएए या कायद्याचा मुस्लिमांवरच नव्हे, तर हिंदुवरही परिणाम होणार आहे. हिंदुनाही नागरिकत्व सिद्ध करताना अडचणी येतील असे आंबेडकर म्हणाले. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. फेब्रुवारीमध्ये तोट्याचं बजेट सादर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडून 24 लाख कोटी जमतील सांगण्यात आलं होतं. पण त्यातले 9 लाख कोटी जमा होणार नाही अशी स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर तासभर चर्चा
यावेळी भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, अॅडमिनिस्ट्रेशन विरोध करु शकतो तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांना सांगण्यात येते की तुम्हांला ती कारवाई करावी लागेल. जे अधिकारी यात सहभागी असतील त्यांना आमची विनंती आहे की त्यांना ज्यांनी कोणी पॉलिटिकल बॉसेसेने कारवाई बाबत सांगितलं त्याचं नाव पत्ता सांगावा आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी करु. यामागे डावी विचारसरणी आहे की उजवी हे कागदपत्र बाहेर आल्यावर कळेल, असेही ते म्हणाले.
24 जानेवारीला सीएएविरोधात राज्यव्यापी बंद, 35 संघटनांचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement