Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून गांधी कुटुंबीय दूर का? दिग्विजय सिंह म्हणाले...
Digvijay Singh On Congress President Election: पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आला. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
![Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून गांधी कुटुंबीय दूर का? दिग्विजय सिंह म्हणाले... Why did the Gandhi family stay away from the election of the Congress president? Digvijay Singh said Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून गांधी कुटुंबीय दूर का? दिग्विजय सिंह म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/22/434b377542f58020229f4873243cc0511663834082318566_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Digvijay Singh On Congress President Election: पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून Congress President Election) काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आला. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) उतरणार असल्याचं बोललं जात आहे. आता यातच आणखी एका नेत्यांची एंट्री होऊ शकते. या नेत्याचं नाव आहे दिग्विजय सिंह (Digvijay Singh). याआधीही त्यांनी पक्षाध्यक्ष होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आज एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी निवडणूक लढवण्याच्या प्रश्नाला स्पष्टपणे नाकारला दिला नाही. ते म्हणाले आहेत, काँग्रेस अध्यक्षा मला जो आदेश देतील ते मी कारेन.
दिग्विजय सिंह म्हणाले की, आतापर्यंत निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या शशी थरूर यांच्याबद्दल ते म्हणाले की, तेही खूप सक्षम आहेत आणि मनीष तिवारी यांनाही आपली उमेदवारी दाखल करायची आहे, तर ते करू शकतात. ज्याला लढायचे असेल तो लढा, असे सोनिया गांधी यांनी आधीच सांगितले आहे. 2024 मध्ये नवे अध्यक्ष मोदींना आव्हान देतील.
गांधी कुटुंबीय निवडणूक लढविण्याबाबत काय म्हणाले दिग्विजय सिंह
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना सांगितले की, गांधी घराण्यातील कोणीही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. यानंतर राहुल गांधी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, गांधी घराण्याला विविध प्रकारच्या घराणेशाहीचा कलंक सहन करावा लागला. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजपवाल्यांनी सोनिया गांधींविरोधात काय म्हणाले होते, हिम्मत असेल तर आता बोलून दाखवा.
पक्षनेतृत्व जे ठरवेल तेच होईल
अशोक गेहलोत पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर नेतृत्व सांगेल तेच करावे लागेल, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, लोक म्हणतात की गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडायचे नाही, हे पूर्णपणे चुकीचे आहे. नेतृत्व त्यांना जे सांगेल ते गेहलोत करतील. याशिवाय गेहलोत पक्षाध्यक्ष झाल्यास राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावावरून सुरू असलेल्या चर्चेवर ते म्हणाले की, सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री बनवायचे की नाही, हे दिग्विजय सिंह नव्हे तर नेतृत्व आणि विधिमंडळ पक्ष ठरवतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
New Delhi : मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम
मुस्लीम धर्मगुरु उमर अहमद इलियासींच्या मते सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता.. दिल्लीच्या मशिदीतील तासाभराच्या चर्चेनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)