Uddhav Thackeray : तुम्ही त्याला आडवा केला, पुन्हा तो आपल्या वाटेला जाणार नाही; उद्धव ठाकरेंचा राहुल शेवाळेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray on Rahul Shewale : "तसं पाहिलं तर हा कार्यक्रम आपल्या निवडणुकीच्या पूर्वी ठरला होता. कोणी तंगडं मध्ये घातलं ते तुम्हाला माहिती आहे. आपल्यामध्ये तंगडं घातलं की काय होतं हे तुम्ही त्याला दाखवून दिलेलं आहे."
Uddhav Thackeray on Rahul Shewale : "तसं पाहिलं तर हा कार्यक्रम आपल्या निवडणुकीच्या पूर्वी ठरला होता. कोणी तंगडं मध्ये घातलं ते तुम्हाला माहिती आहे. आपल्यामध्ये तंगडं घातलं की काय होतं हे तुम्ही त्याला दाखवून दिलेलं आहे. मध्ये आला की त्याला आडवा करायचा. तसं तुम्ही त्याला आडवा केला. पुन्हा तो काही आपल्या वाटेला जाईल असं वाटत नाही. मी तर म्हणेन त्याने वाटेला जाऊ नये, असा एक प्रेमळ सल्ला मी त्याला देतो", असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आर. सी. एफ. कर्मचारी सेना यांच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या सरकारने मुंबई जणू काही विकायलाच काढलेली आहे
View this post on Instagram
उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही फडकवला होता, तो आज फडकतोय. हे तुमचं खास कर्तुत्व आहे. आरसीएफची वाटचाल तुम्ही सांगितली. पहिला मोर्चा किती मोठा झाला होता? मग शरदबाबूंनी काय केलं. आज सुद्धा तसं संकट गेलेलं नाही. संकट नव्याने पुन्हा एकदा समोर उभं राहतय. कारण आताचे जे खोके सरकार आहे. या सरकारने मुंबई जणू काही विकायलाच काढलेली आहे. मुंबईतील मराठी माणूस हद्दपार झाला पाहिजे, ही या सरकारने घेतलेली सुपारी आहे. मी तर म्हणतो हे आता केवळ 2 ते 3 महिन्यांचं राहिलेलं आहे. तुम्ही खासगीकरणाचा विषय काढला, बघू कोणाला एवढी खाज आलेली आहे. येऊनच बघा काय खाजवायचं ते आम्ही पाहून घेऊ.
मराठी माणसाला बेकार करायचं, कंपन्यांच्या जाहिराती येत आहेत
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, यांची अत्यंत घाणेरडी आणि व्यापारी वृत्ती आहे. मुंबईला संपवायची, मुंबईचं वैशिष्ट्य मारुन टाकायचं. मराठी माणसाला बेकार करायचं. कंपन्यांच्या जाहिराती येत आहेत, मराठी माणसाला नो एन्ट्री. इमारती ज्या उभा राहतात, त्यामध्ये मराठी माणसाला नो एन्ट्री. मग पुन्हा 66 सालचा जो काळ होता तो परत उभा करायचा का? हा आम्ही विचार केला तर चुकलं काय? आज 1966 ते 2024 सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. सगळे हिंदू म्हणून राहात आहेत. त्या हिंदूचं रक्षण आम्ही हिंदू म्हणून केलं. आता तर आमच्यासोबत इतर समाजाचे लोकही येत आहेत. एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना हा मीठाचा खडा का टाकताय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Ramgiri Maharaj Exclusive : प्रवचन दीड तासांचे, मोजकाच भाग एडीट केला, वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण; पाहा व्हिडिओ