एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Raj Thackeray: शिवतीर्थावर भाऊबीज साजरी होणार; आदित्य-तेजस ठाकरे उपस्थित राहणार, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंचीही भेट होण्याची शक्यता

Uddhav Thackeray Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने शिवतीर्थवर पुन्हा एकदा भेट होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray: दिवाळीचा (Diwali 2025) सण आणि विशेषतः भाऊबीजेच्या मुहूर्ताच्या (bhaubij 2025) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या दोघांमध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने शिवतीर्थवर भेट होण्याची शक्यता असून, या कौटुंबिक भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे बुधवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर दाखल झाले होते. राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते. आज पुन्हा एकदा भाऊबीज निमित्ताने ठाकरे कुटुंबाची भेट होण्याची दाट शक्यता आहे.

या भेटीत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकमेव बहीण उर्वशी ठाकरे असल्याने यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थवर साजरी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. 

Uddhav Thackeray Raj Thackeray: कौटुंबिक स्नेहबंधांमुळे राजकीय चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही गेल्या काही महिन्यांत आठ भेटी झाल्या आहेत. दोघांमधील या स्नेहभेटी कौटुंबिक कारणांमुळे होत असल्या तरी प्रत्येक भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग मिळत आहे. ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी दोघांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये "ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?" या चर्चेला उधाण आले आहे. आता भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नववी भेट होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Uddhav Thackeray Raj Thackeray: अलीकडील ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी

1. 5 जुलै 2025: मराठीच्या मुद्यावर दोघे ‘विजयी मेळाव्यात’ एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी “एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी,” असे म्हटले होते. 

2. 27 जुलै 2025: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर भेटले.

3. 27 ऑगस्ट 2025: गणेशोत्सवाच्या काळात उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले.

4. 10 सप्टेंबर 2025: उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल देसाईंसह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटले.

5. 5 ऑक्टोबर 2025: संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशात दोघे पुन्हा एकत्र दिसले.

6. 12 ऑक्टोबर 2025: ठाकरे कुटुंबीयांचा स्नेहभोजन कार्यक्रम शिवतीर्थवर पार पडला.

7. 17 ऑक्टोबर 2025: मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

8. 22 ऑक्टोबर 2025: उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर पोहोचले. 

आणखी वाचा 

Amit Bhangare: माझा राजकीय बाप शरद पवारच म्हणणाऱ्या नेत्यानं घेतली विखे पाटलांची भेट; शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार?

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Embed widget