एक्स्प्लोर

Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही

evm tampering news: महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र, सुप्रिया सुळेंनी या या टीकेतील हवाच काढून टाकली आहे.

पुणे: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जवळपास प्रत्येक दिवशी ईव्हीएम यंत्रातील फेरफाराचा मुद्द्यावरुन आगपाखड केली जात आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन कंठशोष करत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मित्रपक्षांच्या धोरणाला छेद देणारी भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला (EVM) दोष देणार नाही, असे म्हटले आहे. त्या बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती असल्याशिवाय त्याबाबत मी दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. मी याच ईव्हीएम यंत्रावर चार निवडणुका जिंकली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.  ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वाचा अभ्यास केला पाहिजे. या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या सगळ्या आक्षेपांमध्ये तथ्य असेल तर त्या गोष्टी बाहेर येतील, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सुप्रिया सुळेंची सरकावर टीका

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले. राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना अशोभनीय आहेत. परभणीतील घटनाही निंदनीय आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन चालणार नाही. या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे. राज्यात पूर्वी इतके भीतीदायक वातावरण कधीच नव्हते, आता मलाही भीती वाटू लागली आहे. चित्रपटांमध्ये जे गुन्हेगारीचे चित्र दिसते तेच आता या राज्यात पाहायला मिळत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

छगन भुजबळांविषयी सुप्रिया सुळे यांना सहानुभूती

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी सुप्रिया सुळे यांनी सहानुभूती व्यक्त केली. भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत. ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या 40-45 वर्षाचे त्यांचे योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. पवार साहेबांच्या अनेक संघर्षामध्ये माननीय भुजबळ साहेब हे पवार साहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी आयुष्यभर खूप संघर्ष केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागा ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी असायची, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलनामागचे 'हे' आहे वास्तव; ग्रामस्थांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Agri Stack :
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी,"ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishal Gavali Kalyan Case : कल्याणमध्ये आणल्यानंतर पोलीस विशाल गवळीला कोर्टात हजर करणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaBeed Crime Special Report : गन कल्चर मुक्त बीड कधी होणार? हजारो जणांना शस्त्र परवाने कशासाठी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Agri Stack :
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी,"ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु
Manikrao Kokate : 28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
Swamitva Yojana : प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती
प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती
Sam Konstas vs Jasprit bumrah : अवघ्या 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या भीतीचं सावट झटक्यात नाहीसं केलं, एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
अवघ्या 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या भीतीचं सावट झटक्यात नाहीसं केलं, एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
Embed widget