Markadwadi : मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलनामागचे 'हे' आहे वास्तव; ग्रामस्थांचा दावा
Markadwadi : मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे खरे वास्तव आज ईव्हीएमला पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांनी समोर आणले आहे.
Markadwadi माळशिरस : मारकडवाडी (Markadwadi) येथील ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे खरे वास्तव आज ईव्हीएमला (EVM) पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांनी समोर आणले आहे. मारकडवाडी हे एक गाव नसून या परिसरातील जवळपास 55 गावे हे कायम मोहिते पाटील यांच्या विरोधात मतदान करत आलेली आहेत. आमचा विरोध उत्तम जानकर यांना नाही तर ते मोहिते पाटील यांचे उमेदवार असल्याने तो विरोध मतदानातून दिसल्याचे ग्रामस्थ सांगतात. मोहिते पाटलांची इतकी वर्ष सत्ता असून माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात त्यांना कायमच विरोध होत आलेला आहे. आजही होतो आणि उद्याही राहील अशी ठाम भूमिका ही ग्रामस्थांनी घेतली आहे.
मोहिते पाटलांची वर्षानुवर्ष सत्ता असूनही या भागाचा कधीही विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. उलट कायम तालुक्याच्या पश्चिम भागावर अन्याय केल्याची भूमिका लोकांच्या मनात रुजली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हा धनगर बहुल भाग असून मोहिते पाटील यांनी अगदी धनगर समाजाचा उमेदवार दिला तरी देखील त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न या भागातील लोक करतात, हा इतिहास असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ईव्हीएम विरोधतील आंदोलन म्हणजे एक स्टंट
गेल्यावेळी राम सातपुते हे मोहिते पाटील यांचे उमेदवार म्हणून उभे असतानाही या 55 गावाने सातपुते यांना अतिशय कमी मते दिली होती आणि त्याच वेळेला मोहिते पाटलांच्या विरोधात लढणाऱ्या उत्तम जानकर यांना भरभरून मतदान झाले होते. आता चित्र उलटे झाले असून उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यावर उभे राहिल्याने या संपूर्ण उत्तम जानकर यांच्या विरोधात मतदान केले आहे . सध्या ईव्हीएम ला विरोध करण्याचे आंदोलन हे एक स्टंट असून आता अगदी बॅलेट वर जरी मतदान घेतले तरीही उत्तम जानकर यांना यापेक्षा कमी मते मिळतील, असा दावाही या ग्रामस्थांनी केला आहे.
मारकडवाडी आणि पश्चिम भागातल्या 50 ते 60 गावांचा विरोध हा उत्तम जानकर ला नाही तर मोहिते पाटील यांना आहे. त्यामुळे यावेळी उत्तम जानकर हे मोहिते पाटील गटाकडून उभारल्याने त्यांना अशा पद्धतीने या सर्व भागातून कमी मते पडली, असा दावा या परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षात सत्ता असूनही मोहिते पाटील हे कधीही या भागातील विकासासाठी पुढे न आल्याने हा संपूर्ण पश्चिम भाग हा कायमच मोहिते पाटील यांच्या विरोधात राहिला आहे.
गेल्यावेळी भाजप कडून विजयी झालेले राम सातपुते हे देखील मोहिते पाटलांचे उमेदवार असल्याने त्यांना गेल्या वेळी केवळ 272 मते मिळाली होती. आता ते मोहित्यांच्या विरोधात उभारल्याने त्यांना 1003 मते मिळाली असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. या भागातील कोणत्याही गावात गेला तरी कायम ग्रामपंचायत पासून आमदारकी पर्यंत सर्व निवडणुका मोहिते पाटलांच्या उमेदवाराच्या विरोधात हा भाग मतदान करतो हा इतिहास आहे असा दावाही ग्रामस्थांनी केला.
उत्तम जानकरांना सर्व परिस्थिती माहीत असूनही....
उत्तम जानकर यांनाही सर्व परिस्थिती माहीत असून ती केवळ स्टंट करीत आहेत. या भागाचा विरोध उत्तम जानकर यांना नसून तो मोहिते पाटलांना आहे आणि जो उमेदवार मोहिते पाटील गटाकडून उभारेल त्याच्या विरोधातच याच्यापुढेही असेच मतदान होत राहील. अगदी बॅलेट वर जरी मतदान घेतलं तरी सातपुते यांना याहीपेक्षा जास्त मते मिळतील, असा दावा या ग्रामस्थांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या