एक्स्प्लोर

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंना विनंती, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

Lok Sabha Election Result 2024: नुकतंच श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावं अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

NDA Government Formation: नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) आता केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत (Delhi) हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये (Modi Cabinet) कोणकोण असणार याची चर्चा आहे. एनडीएतील (NDA) घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नुकतंच श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावं अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काल शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी या बैठकीत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला. 

शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून काही खासदारांनी ही भूमिका घेतली. शिवसेनेच्या विजयी खासदारांमध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, मुंबई उत्तर पश्चिमचे रविंद्र वायकर असे सर्व वरिष्ठ नेते आहेत. 

एकनाथ शिंदे यांना 7 जागा 

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळवता आला. यामध्ये कल्याणचे श्रीकांत शिंदे, ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.

शिवसेनेचे खासदार

  • कल्याण लोकसभा - श्रीकांत शिंदे
  • ठाणे लोकसभा - नरेश म्हस्के
  • मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर
  • हातकणंगले - धैर्यशील माने
  • छत्रपती संभाजीनगर - संदीपान भुमरे 
  • बुलढाणा लोकसभा - प्रतापराव जाधव
  • मावळ लोकसभा - श्रीरंग बारणे

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

  • एनडीए आघाडी- 293
  • इंडिया आघाडी- 232
  • इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

  • महाविकास आघाडी- 30
  • महायुती- 17
  • अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

  • भाजप- 9
  • शिवसेना (शिंदे गट)-7
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

  • काँग्रेस- 13
  • ठाकरे गट-9
  • शरद पवार गट-8

अपक्ष - 1

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 4 मंत्रिपदं, दादांच्या राष्ट्रवादीलाही 2, मोदी कॅबिनेटमध्ये लॉटरी लागण्याची चिन्हं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Embed widget