एक्स्प्लोर

Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका

Ajit Pawar assets released by Income Tax: न्यायालयाच्या आदेशानुसार अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची 1000 कोटींची संपत्ती मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई: राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी आयकर खात्याने मोठा दिलासा दिला होता. आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली होती. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता (Mahayuti Government) येताच आयकर खात्याने या मालमत्तेवरचा ताबा सोडला आहे. त्यामुळे अजित पवार  आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपली मालमत्ता पुन्हा मिळणार आहे. हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अजित पवार आणि भाजपला टोला लगावला आहे. 

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज आयकर खात्याने जप्त केलेली संपत्ती परत केली. अजित पवार यांनी लोकशाहीच्या बळटीकरणासाठी मोठ्या कष्टाने जो लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे.हा लोकशाहीच्या बळटीकरणाचा लढा याआधी राहुल कनाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता. सन्माननीय अजितदादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अजित पवार 2023 साली शरद पवार यांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अजित पवार गटाने थोडाही अवधी न दवडता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर 5 सप्टेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला होता. या सोहळ्यात अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या नरिमन पॉईंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांचा समावेश होता. याशिवाय, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात होते. या कारवाईनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना आपण आयकरासंबंधी  सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता. आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाला जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले होते. 

आणखी वाचा

मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!
जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!
Supriya Sule on Baramati Byelection 2026: रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Eknath Shinde Shivsena: मध्यरात्री सुरु झालेली गुप्त बैठक पहाटे संपली? ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची आवई उठताच खासदारांच्या धडाधड प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...
मध्यरात्री सुरु झालेली गुप्त बैठक पहाटे संपली? ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची आवई उठताच खासदारांच्या धडाधड प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Nashik Crime News: महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
Embed widget