एक्स्प्लोर

Sharad Pawar news: मोठी बातमी: शरद पवारांची प्रकृती बिघडली, सलाईन लावण्यासाठी पुन्हा रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

Sharad Pawar news: शरद पवार यांना 14 फेब्रुवारीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, आठवडाभरातच त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे.

Sharad Pawar news:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी आधारवड असणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल  रुग्णालयात (Ruby Hall Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवार नुकतेच पाच दिवस रुग्णालयात राहून घरी परतले होते. मात्र, आता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल आले आहे. (Pune News)

प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या छातीत कंजेशन झाल्यामुळे पवारांना बारामतीवरुन पुण्याला आणण्यात आले होते. शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

आणखी वाचा

शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'मविआतील तिन्ही पक्ष मिळून...'

अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget