एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

कोठी-कोरणार पुलाचा काही भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे, या प्रकारामुळे गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

गडचिरोली : पावसाळा (Rain) आला की रस्त्यावरील खड्डे आणि विविध भागातील पुलांच्या विरादरक स्थितीचे चित्र पाहायला मिळते. तसेच, संबंधित बांधकाम किंवा कामाच्या ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे राहतात. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याने मोठा राजकीय वादंग झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात स्पष्टीकरण देखील दिले होते. आता, मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते तीन वर्षापूर्वी उद्घाटन झालेला कोठी-कोरणार पूल पुरामुळे खचला तर काही भागच वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन, विरोधी पक्षातील नेत्यांनी पुन्हा एकदा शासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

कोठी-कोरणार पुलाचा काही भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे, या प्रकारामुळे गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यावेळचेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन झाले होते. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके असे या पुलाला नाव देण्यात आले होते. मात्र, तीन वर्षांतच पूल खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक देखरेख आणि कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

आता काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन या पुलाचे फोटो शेअर केले आहेत, तसेच आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा, असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावला. 

आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा - रोहित पवार

आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आपणच उद्घाटन केलेला पूल 3 वर्षे व्हायच्या आतच खचला.. छे… छे… खचला नाही.. कदाचित तीन वर्षांची durability चेक करत असतील असतील किंवा हे एखादं नवीन डिझाईन असावं, जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपात दिसेल. पूल खचला म्हणलं तर कदाचित आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा, असे म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, दलालीच्या दलदलीत मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार? आज केवळ पूल खचला, पण गेल्या तीन-चार वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली cost escalation करून भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की! असेही रोहित पवार यांनी म्हटले. 

हेही वाचा

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget