एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातामागे घातपात होता का, याची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेबाबत संशय.

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती (Baramati news) तालुक्यातील लोणी भापकर हे गाव रविवारी बंद असणार आहे. यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे. अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. तसेच आमच्या गावातील सर्व संघटना व ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सामील होणार आहेत, असे  पत्र लोणीभापकर ग्रामपंचायतीने पोलिसांना दिले आहे. (Maharashtra Politics news)

अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना अपघात झाला होता. त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर त्यांचा विमानाचा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. 29 जानेवारीला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी बारामतीत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत शोककळा पसरली होती. तसेच अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड पोकळी निर्माण झाली होती.

आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर मांडणी केली होती. यावेळी त्यांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि पायलट सुमित कपूर यांच्याबाबत संशय व्यक्त केला होता. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधन होते. त्यामुळे मोठा स्फोट झाला. वैमानिक सुमित  कपूर यांनी विमान जमिनीवर मुद्दाम आदळले असावे, अशी शक्यताही रोहित पवार यांनी बोलून दाखवली होती. 

Amol Mitkari: अमोल मिटकरींचा रोहित पवारांना पाठिंबा

आदरणीय दादांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर यावे याकरिता तांत्रिक बाबी आणी पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणून विचार करायला भाग पाडणाऱ्या ,आमदार श्री रोहित पवार यांनी उभारलेल्या लढ्यात आम्ही दादांवर निष्ठा असणारे सर्व सामान्य कार्यकर्ते संपुर्ण ताकदीनीशी न्याय मिळेपर्यंत व सत्य समोर येईपर्यंत या लढ्यात कायम सोबत आहोत.सत्य समोर आणणे हीच दादांना खरी आदरांजली व दादांप्रती निष्ठा ठरेल, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

आदरणीय दादांच्या विमानासाठी नियुक्त केलेले साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट त्यादिवशी कुठे अडकले होते व आता कुठे आहेत, बस इतकीच माहिती मिळावी. ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर झाल्यावर मिळाला तरी हरकत नाही, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे.

आणखी वाचा

पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: गॅस टंचाईची भीती; सिलिंडरसाठी सलग चौथ्या दिवशी पुणेकरांच्या एजन्सीबाहेर रांगा
Maharashtra Breaking LIVE Updates: गॅस टंचाईची भीती; सिलिंडरसाठी सलग चौथ्या दिवशी पुणेकरांच्या एजन्सीबाहेर रांगा
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
DCM Sunetra Pawar: अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Embed widget