एक्स्प्लोर

'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीला बुधवारी सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या सकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.

Sharad Pawar: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्ष 56 वरून 10 जागांवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांसाठी दंड थोपटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान विधानसभेत गाफील राहिल्याची कबुली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीला बुधवारी सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या सकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. लोकसभेतलं घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला. दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी गेले हिंदुत्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रूपात त्यांना मिळाल्याचे पवार म्हणाले. 

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी होणार मोठे बदल

निवडणुकांचे यश शंभर टक्के नसते. 1952 च्या निवडणुकीत काँग्रेसने 90% जागा जिंकल्या होत्या 1957 च्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला अनेक जिल्ह्यात शून्य तर काही जिल्ह्यात एक दोन जागाच मिळाल्या, असेही पवार म्हणाले. आज पासून कामाला लागा आपल्याकडे संपूर्ण पाच वर्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत मोठी जोखीम घेणार आहे. महिलांना 50 टक्के तर खुल्या गटात 60 टक्के उमेदवारी तरुणांना दिली जाईल. प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना प्राधान्य नसेल. पक्ष संघटनेत 70 टक्के वाटा नव्या चेहऱ्यांना देण्याची गरज असल्याचं सांगण्यात आला असून 35 च्या पुढच्या कार्यकर्त्यांनी आता राज्य पातळीवर काम करण्याचं आवाहन पवारांनी आढावा बैठकीत केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात येत्या दोन दिवसात महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुनील तटकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे. 

हेही वाचा:

मोठी बातमी: शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंकडून 7 जणांना संपर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Embed widget